Sangli: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेला, अन् वीज पडून एकाचा मृत्यू झाला; बुधगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 12:01 IST2023-04-21T12:00:51+5:302023-04-21T12:01:10+5:30

अंत्यविधी प्रक्रिया सुरू असतानाच वीज कोसळली

A person who attended a funeral at Budhgaon in Sangli died due to lightning | Sangli: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेला, अन् वीज पडून एकाचा मृत्यू झाला; बुधगाव येथील घटना

Sangli: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेला, अन् वीज पडून एकाचा मृत्यू झाला; बुधगाव येथील घटना

बुधगाव (जि. सांगली) : बुधगाव (ता. मिरज) येथे अंत्यविधीला गेलेल्या एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयकांत रहितराम गोसावी (३२, रा. बुधगाव) असे मृताचे नाव आहे. पिराजी शिवाजी गोसावी (३२, रा. बुधगाव) हा जखमी आहे.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बुधगाव परिसरात वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, बुधगाव येथील मीरा दिलीप गोसावी (५५) यांचे आजारपणामुळे गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कवलापूर विमानतळाशेजारील बुधगावमधील गोसावी समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंत्यविधी प्रक्रिया सुरू असतानाच काही अंतरावर उभे असलेल्या जयकांत गोसावी व त्याचा मित्र पिराजी गोसावी यांच्या जवळ वीज कोसळली. यामध्ये जयकांतचा जागीच मृत्यू झाला, तर पिराजी गंभीर जखमी झाला.

Web Title: A person who attended a funeral at Budhgaon in Sangli died due to lightning