शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: ईश्वरपुरातील एका कुटुंबास ९२ लाखांचा गंडा, आजरा तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:38 IST

बनावट सह्या करून रक्कम उकळली

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील मंत्री कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाचा विश्वास संपादन करत, त्यांनी बँक आणि पतसंस्थेत ठेव पावती करण्यासाठी वेळावेळी दिलेल्या ९२ लाखांच्या रकमेवर आजरा तालुक्यातील ठकसेनाने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार २०२० ते मार्च २०२५ या कालावधीत घडला आहे.याबाबत डॉ.राणोजी अशोकराव शिंदे (वय ५०) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन विष्णू पाटकर (रा.वझरे, ता.आजरा, जि.कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली फसवणूक, विश्वासघात, ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन पाटकर याने डॉ.राणोजी शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आई, वडील व इतर सदस्यांचा विश्वास संपादन केला होता.त्यामुळे कुटुंबातील सर्वजण त्याच्याकरवी बँक आणि पतसंस्थेमधील आर्थिक व्यवहार करत होते. त्यांच्या या विश्वासाचा गैरफायदा घेत, पाटकर याने ५ वर्षांच्या काळात तब्बल ९२ लाख १५ हजार ७६५ रुपये इतकी रक्कम त्यांना परत न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. पोलिस उपनिरीक्षक सतीश मिसाळ अधिक तपास करीत आहेत.

बनावट सह्या करून रक्कम उकळलीपाटकर याने या शिंदे कुटुंबाच्या परस्पर बँकेत जाऊन शिंदे यांच्या आई-वडिलांच्या नावाने असलेल्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर तर काही पावत्यांची मुदत संपण्यापूर्वी रक्कम मिळण्यासाठी दोघांच्या नावाने पैसे काढण्याच्या स्लिपवर बनावट सह्या करून ही रक्कम उकळली आहे, तसेच त्याने बँकेत रक्कम जमा केली आहे, हे भासविण्यासाठी बँकेच्या नावाने हुबेहूब दिसणाऱ्या बनावट पावत्या तयार करून त्या खऱ्या आहेत असे सांगत, या कुटुंबांची फसवणूक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Family Duped: Ajara Man Booked for 9.2 Million Fraud

Web Summary : A family in Islampur lost ₹9.2 million to a man from Ajara who gained their trust and misappropriated funds meant for bank deposits. He forged signatures and created fake receipts over five years.