शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक, बिळाशीचा एकजण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:53 IST

जखमीची प्रकृती चिंताजनक

बिळाशी : काशीळ-सातारा रस्त्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात बिळाशी (ता. शिराळा) येथील दत्तात्रय आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले संतोष वासुदेव शिंदे गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद बोरगाव (सातारा) पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे बिळाशी परिसरात शोककळा पसरली आहे.शनिवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास बिळाशी येथील संतोष वासुदेव शिंदे (वय ४०) हे दत्तात्रय आनंदा पाटील (वय ४०) यांना सोबत घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच १०-१०५३) आपल्या सासूरवाडी शेंद्रे (ता. जि. सातारा) येथे गेले होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळास पाहून ते परत येत होते.सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास काशीळ फाट्याच्या पुढे रॉयल हॉटेलसमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकले. या अपघातात दत्तात्रय पाटील आणि संतोष शिंदे या दोघांनाही डोक्याला जबर मार लागल्याने ते खाली पडले. घटनेची गंभीरता ओळखून स्थानिकांनी १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना ग्रामीण रुग्णालय सातारा येथे नेले. मात्र, दत्तात्रय पाटील यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर संतोष शिंदे यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवार, दि. १० रोजी बिळाशी येथे दत्तात्रय पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने बिळाशी गावात हळहळ व्यक्त होत आहे.