Sangli: दुचाकी लंपास करणारा अल्पवयीन चोरटा ताब्यात
By शरद जाधव | Updated: December 2, 2023 19:02 IST2023-12-02T19:02:12+5:302023-12-02T19:02:28+5:30
सांगली : कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महागड्या दुचाकी लंपास करणाऱ्या अल्पवयीन मुलास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ...

Sangli: दुचाकी लंपास करणारा अल्पवयीन चोरटा ताब्यात
सांगली : कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महागड्या दुचाकी लंपास करणाऱ्या अल्पवयीन मुलास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून अडीच लाख रुपयांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
एलसीबीचे पथक कवठेमहांकाळ तालुक्यात गस्तीवर असताना माहिती मिळाली की, संशयिताने दुचाकी चोरून त्या शेतातील कडब्याच्या गंजीलगत लपवून ठेवल्या आहेत. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या घराजवळ पाहणी केली असता, तीन दुचाकी आढळून आल्या. त्याने या दुचाकी विद्यानगर, कवठेमहांकाळ, लोणारवाडी आणि खिळेगाव (जि. बेळगाव) येथून चोरून त्या कडब्यात लपवून ठेवल्याची कबुली दिली.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अमोल लोहार, कुबेर खोत, अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.