शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पत्नीने वाद घातल्याचा राग, डोक्यात बांबूने वार करुन केला खून; पतीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:04 IST

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रिक्षात बसवून उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मृत्यू झाल्याचे समजताच पतीने रुग्णालयातून पळ काढला

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील सुनंदा कुमार जाधव (वय ३०) या विवाहित महिलेचा घरगुती वादातून पतीने डोक्यात बांबूने जोरदार हल्ला केल्यामुळे जागीच मृत्यू झाला. पत्नी मृत झाल्याचे समजताच पतीने पलायन केले. मात्र, कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने संशयित पतीच्या मुसक्या आवळून गजाआड केले. कुमार भीमराव जाधव (वय ३८, सध्या रा. दत्तनगर, बामणोली, ता. मिरज आणि मूळ गाव जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, बामणोली येथील दत्तनगर भागात संशयित कुमार जाधव हा गेल्या काही वर्षांपासून पत्नी, तीन मुलींसह भाड्याच्या खोलीत राहत आहे. जाधव हा कुपवाड एमआयडीसीतील एका कारखान्यात हमाली करीत होता. त्याचा विवाह २००३ मध्ये (तावशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील मोहन जगदाळे यांची मुलगी सुनंदा यांच्याबरोबर झाला होता. बुधवारी रात्री संशयित कुमार जाधव व पत्नी सुनंदा याच्यात घरगुती कारणावरून व तू माहेरहून पैसे आण या कारणावरून वाद झाला.पत्नीने वाद घातल्याचा राग मनात आल्याने पती कुमार याने पत्नी सुनंदा हिला घरातून फरफटत घराबाहेर अंगणात आणून बांबूने डोक्यात जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात सुनंदा रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पती कुमार याने शेजारील एका रिक्षाचालकाला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रिक्षात बसवून उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. यावेळी संशयित कुमार याने डाॅक्टरांना सांगितले की, पत्नी घरात फरशीवर पाय घसरून पडल्याने जखमी झाली आहे. डाॅक्टरांनी पत्नी सुनंदा हिची तपासणी केली असता, तिचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पती कुमार जाधव याने रुग्णालयातून पळ काढला. डाॅक्टरांनी या घटनेची माहिती कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, हवालदार गजानन जाधव, संदीप पाटील, सतीश माने, महादेव नागणे यांनी तातडीने संशयित कुमार जाधव याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस