लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ

By संतोष भिसे | Updated: August 27, 2022 13:38 IST2022-08-27T13:26:19+5:302022-08-27T13:38:12+5:30

याप्रकरणी एका निवृत्त हवालदाराच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

A girl body was found hanging in a lodge in Sangli | लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ

लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ

सांगली : सांगलीत कोल्हापूर रस्त्यावरील एका लॉजमध्ये अस्मिता पाटील या तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तपास सुरु केला. याप्रकरणी एका निवृत्त हवालदाराच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही मित्र असून रात्रीच या लॉजमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे.

आज, शनिवारी सकाळी अस्मिताचा मृतदेह छताला लटकलेल्या स्थितीत मिळाला. पोलिसांनी संबंधित तरुणाला विचारणा केली असता, अस्मिताने आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी मी स्वच्छतागृहात गेलो होतो, असेही सांगितले. प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचे दिसत असले, तरी खुनाच्यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

दोघेही सांगलीतील रहिवासी आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्यात मैत्री होती असे पोलिसांनी सांगितले. अस्मिताच्या मृतदेहाची शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अभिजित देशमुख पुढील तपास करत आहेत.

Web Title: A girl body was found hanging in a lodge in Sangli