शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘दहा पक्ष बदललेला बाबा कुणाचाच नाही’; जयंत पाटलांचे सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:34 IST

राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

सांगली: राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. "दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे, तो आता मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय, पण भाजपलाही पक्के ठाऊक आहे की हा माणूस कोणाचाच नाही," अशा शब्दांत जयंत  पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले.

काही दिवसांपूर्वी वाळवा येथील एका जाहीर सभेत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली होती. “आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसात ते भाजपात येतील.” तसेच, त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार घ्यावा, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यांच्या या विधानामुळे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

आमदार सदाभाऊ खोत यांच्या टीकेला आज जंयत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. "काही लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते. जयंत पाटील यांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे काहीही तथ्य नसलेली विधाने करणे हा त्यांचा रोजचा ठरलेला कार्यक्रम आहे."

"ज्यांनी स्वतः आयुष्यात दहावेळा पक्ष बदलले, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. अशा नेत्यांना कोणताही पक्ष गांभीर्याने घेत नाही, कारण त्यांची राजकीय भूमिका वारंवार बदलत असते. भाजपलाही त्यांच्या या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे," असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. शनिवारी मतदान होणार असून रविवारी निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशा लढती दिसत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jayant Patil Retorts: 'Ten-Party Hopper, Khot, Nobody Trusts You!'

Web Summary : Jayant Patil strongly criticized Sadabhau Khot for advising him to join BJP, highlighting Khot's frequent party changes. Patil questioned Khot's credibility, stating that even BJP recognizes Khot's unreliability amidst local elections.
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSadabhau Khotसदाभाउ खोत