उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, मालकाने डॉक्टरला बदडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:06 IST2023-05-29T13:04:29+5:302023-05-29T13:06:23+5:30
डॉ. चौगुले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली

उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, मालकाने डॉक्टरला बदडला
सांगली : शहरातील मोती चौक परिसरात उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला म्हणून डॉक्टरला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी डॉ. रावसाहेब बळवंत चौगुले (रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) यांनी योगेश सव्वाशे (रा. सांगली), त्याचा भाऊ व अन्य पाच ते सात जणांविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सव्वाशे याच्या कुत्र्याच्या डोळ्यास इजा झाल्याने उपचारासाठी ते डॉ. चौगुले यांच्याकडे कुत्र्याला घेऊन आले होते. यावेळी उपचार सुरू असताना, कुत्र्याचा मृत्यू झाला. यावरून डॉ. चौगुले व स्वप्निल आनंदा पाटील यांना मारहाण करण्यात आली. यावेळी दवाखान्यातील औषधे व फ्रिजमधील औषधांचेही नुकसान करण्यात आले. यानंतर डॉ. चौगुले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.