शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बेडग येथे धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:24 IST

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसात माजी ...

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेडग येथे गट नंबर २२५८ मधील दीड एकर जमिनीच्या मालकीबाबत राहुल ओमासे व जितेंद्र ओमासे यांच्यात वाद आहे. हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. याबाबत न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करीत दि. २२ रोजी दुपारी दोन वाजता जितेंद्र ओमासे व जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघू नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे (सर्व रा. बेडग) हे बेकायदा जमाव जमवून वाद सुरू असलेल्या शेतात गेले. तेथे राहुल ओमासे यांच्या ताब्यातील जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी ओमासे यांच्या झोपडीत घुसून त्यांना घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडून नुकसान केले. यावेळी राहुल ओमासे यांचे वडील सुरेश यांना मारहाण करून राहुल व त्यांच्या आईस शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. याबाबत राहुल सुरेश ओमासे (वय २४, रा. बेडग, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली असून, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जितेंद्र ऊर्फ बाळासो ओमासे, रघू नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे (सर्व रा. बेडग) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११९(१), ३३३, १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२), ३५२, ३२४(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक माने यांनी भेट दिली. याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक माने यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीDhananjay Mundeधनंजय मुंडेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस