सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका

By शरद जाधव | Updated: August 4, 2023 21:15 IST2023-08-04T21:15:03+5:302023-08-04T21:15:19+5:30

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची कारवाई

A brothel running under the name of spa center in Sangli was burst | सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका

सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसायासाठी फ्लॅट उपलब्ध करून देणारा संशयितासह अन्य एक एजंटाचा पोलिस शोध घेत आहेत. शहरातील अनेक हाॅटेल, लॉजवर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या कल्याणकर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्पा सेंटर, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सुरूवातील डमी ग्राहक पाठवून याबाबतची खातरजमा करण्यात आली. यानंतर पथकाने तिथे जात ही कारवाई केली.


यात पाच महिलांची सुटका करण्यात आली. वेश्या व्यवसायासाठी फ्लॅट देणारा संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले तर हा अड्डा चालविणाऱ्या दोन एजंटांचा आता पोलिस शोध घेत आहेत. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार संशयितांवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: A brothel running under the name of spa center in Sangli was burst