शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

९३ हजार कुटुंबं जातात उघड्यावर शौचाला!

By admin | Updated: April 5, 2015 00:05 IST

शौचालयांबाबत अनास्था : उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ

अशोक डोंबाळे ल्ल सांगली
जिल्ह्यातील ९३ हजार ८०४ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जात असल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे. गेल्या चार वर्षांत ७०४ गावांपैकी ४७५ गावे शंभर टक्के निर्मल झाली असून, २२९ गावे निर्मलग्राम करण्यासाठी स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) हा राष्ट्रीय कार्यक्रम २ आॅक्टोबरपासून देशभरात सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या घरी शौचालय असणे, त्याचा निरंतर वापर करणे असे चित्र निर्माण करण्यासाठी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान दिले जाते, मात्र महागाई लक्षात घेता शासनाचे अनुदान अत्यल्प आहे. त्यामुळे या उपक्रमाला पाहिजे तेवढे यश मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ८५६ कुटुंबांंपैकी २ लाख ८८ हजार ५२ कुटुंबे शौचालयाचा वापर करीत आहेत. पलूस तालुका शंभर टक्के शौचालययुक्त झाला असून, खानापूर तालुक्यातील एक गाव सोडल्यास अन्य गावे निर्मलग्राम झाल्याचा फेब्रुवारी २०१५ चा अहवाल आहे.
या अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ८०४ कुटुंबांकडे शौचालय नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ८५६ कुटुंबांपैकी वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ८५८ कुटुंबांकडे शौचालय असून, आटपाडी तालुक्यात सर्वात कमी शौचालये आढळून आली. या तालुक्यात केवळ १७ हजार ९० कुटुंबांकडे शौचालय आहे. येथील आठ हजार ३४६ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जात आहेत. ग्रामीण व शहरी भागाकरिता शौचालययुक्त गाव ही संकल्पना १०० टक्के अमलात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंतचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता, यासाठी शासन व प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे. २०१७-१८ पर्यंत जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त करण्याचे उद्दिष्ट पाणी व स्वच्छता अभियान कक्षाने ठेवले आहे. सध्याची गती पहाता ते पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.