शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात आजपासून ७ दिवसांचा जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने विटा शहरात आज, शुक्रवारपासून ७ दिवसांचा जनता कर्फ्यू ...

विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने विटा शहरात आज, शुक्रवारपासून ७ दिवसांचा जनता कर्फ्यू लागु केला आहे. याची घोषणा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी गुरुवारी विटा येथे पत्रकार परिषदेत केली.

या सात दिवसांत औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असून व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

वैभव पाटील म्हणाले, खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ग्रामीण भागातून लोक शहरात येत असतात. त्यामुळे उर्वरित तालुक्यातदेखील जनता कर्फ्यू लावणे गरजेचे आहे. या जनता कर्फ्यूमध्ये कोणी दुकाने उघडण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरात मोठी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीमुळे विटा शहरासह तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा आता प्रतिदिन सुमारे २५० वर जाऊन पोहोचला आहे. शहरासह तालुक्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विट्यात शुक्रवार (दि. ३० एप्रिल)पासून ७ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चौकट

जिवापेक्षा मोठे काही नाही

सुरुवातीला आम्ही आवाहन करीत आहोत; परंतु त्याचा गैरफायदा घेऊन कोणी दुकाने सुरू ठेवली तर सुरुवातीला एक-दोनदा समजावून सांगितले जाईल. मात्र, तरीही कोणी मुद्दाम अशा चुका पुन्हा करीत असेल तर मग त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत विटेकरांच्या जिवापेक्षा आपल्याला मोठे काही नाही, असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले.