शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईची चिंता दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:28 IST

रब्बीसह उन्हाळ्यात सुद्धा भासणार नाही पाणी टंचाई : बोअर, विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. १ फेब्रुवारीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८३ पाझर तलावांमध्ये ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामात व पुढील उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत पाण्याची चिंता नाही. कोणत्याही ठिकाणी टँकर सुरू होतील अशी परिस्थिती नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये मोरना (ता. शिराळा), सिद्धेवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १,७६० दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे. सध्या १ हजार २७९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, ७३ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ७८ लघु प्रकल्प असून, ६ हजार १५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता आहे. याठिकाणी ३ हजार ९८२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ६६ टक्के आहे. मध्यम आणि लघु असे ८३ प्रकल्प जिल्ह्यात आहेत.जिल्ह्यास नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वर्षीच्या उन्हाळ्यात जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर सुरू होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. परंतु, गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये एप्रिल व मे महिन्यांत अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे या दोन महिन्यांत ग्रामीण भागात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यानंतर दोन महिने पावसाने थोडीफार उघडीप दिली. मात्र, त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.नेहमीच ड्राय भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात एवढा पाऊस झाला की शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील सर्वच तलाव तुडुंब भरले होते. ही एका अर्थाने समाधानकारक बाब ठरली. आता फेब्रुवारी महिना सुरु असून उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत फारशी पाणी टंचाई जाणवणार नाही. तसेच हे जून अखेरपर्यंत पाणी उपलब्ध असेल.

जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थितीतालुका / तलाव संख्या / पाणी साठ्याची टक्केवारीतासगाव / ७ / ६८खानापूर / ८ / ७४कडेगाव / ७ / ६३शिराळा / ५ / ६९आटपाडी / १३ / ७७जत / २७ / ६३क. महांकाळ / ११ / ६९मिरज / ३ / ८५वाळवा / २ / ४७

सद्या १० टक्के जादाच पाणीसाठाजिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२५ मध्ये ८३ पाझर तलावांमध्ये ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. चालू वर्षी १ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत सद्या १० टक्के पाणीसाठा जास्त आहे. प्रशासन आणि नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर केल्यास आगामी दोन महिने तरी जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे चित्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Secured: Ample Water Supply Alleviates Scarcity Concerns

Web Summary : Sangli district boasts 68% water storage in dams, eliminating immediate water scarcity fears. Good rainfall filled reservoirs, benefiting rabi crops and easing summer concerns. Tankers unlikely needed, ensuring water availability until June.