शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:45 IST

दोन प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत

विकास शहा शिराळा : एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरु असताना कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पर्जन्यमापक यंत्रणा ११ जून पासून कोलमडली आहे. ५२ यंत्र बंद असल्यामुळे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीची पाणीपातळी याची माहितीच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कसे करणार?, असा प्रश्न पडला आहे.यंत्रणा चालविण्याचा पाच वर्षाचा करार दि.११ जूनला संपल्याने तसेच मंत्रालयातून नवीन करारास अद्याप मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे ही यंत्रणा असून कुचकामी ठरली आहे.आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी  पडणाऱ्या पावसाची नोंद व धरणातील पाणीसाठा याच्या गणितावर पाणी सोडण्याची यंत्रणा कार्यरत असते. पूर्वी शासकीय पातळीवर कर्मचारी वर्गामार्फत नोंदी घेतल्या जात होत्या, मात्र त्यास मर्यादा येत होत्या.आता स्वयंचलित ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. साटेलाईटद्वारा सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ अशी चोवीस तासातील माहिती संकलित केली जाते.ही यंत्रणा चालविण्यासाठी ऑपरेटर, अधिकारी आदींसाठी कंपनी बरोबर पाच वर्षांचा करार केला जातो. हा करार ११ जून रोजी संपला आहे. नवीन कराराचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत पडला आहे. याबाबत संबंधित कार्यालयास कोणतेही गांभीर्य नाही. सध्या पावसाचे प्रमाण जास्त असूनही यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सुरू होणे आवश्यक होते.

२३ ठिकाणी यंत्रणा बंदकृष्णा नदी खोऱ्यात ५९ व भीमा नदी खोऱ्यात ७५ स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणा बसविण्यात आली आहे. कृष्णा खोऱ्यातील आजअखेर यातील २३ यंत्रणा बंद पडल्या आहेत.

पाथरपुंज महत्त्वाचे ठिकाणचांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज हे केंद्र पावसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे कारण येथे चेरापुंजी पेक्षाही जास्त पाऊस पडला होता. तसेच  १जून २०२४ ते ३१ मे २०२५ यादरम्यान चेरापुंजीपेक्षा फक्त ६५० मिलिमीटर पाऊस कमी होता.

स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणा चालविण्याबाबत असणारा पाच वर्षांचा करार दि.११ जून रोजी संपला आहे.जुन्या टेंडर करार मुदतवाढीचा तसेच नवीन टेंडर मंजुरीसाठी असे दोन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ही यंत्रणा सुरू होईल. - मयुरा जोशी, कार्यकारी अभियंता जल विज्ञान विभाग, सांगली.