शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर ५० हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या प्रारूप मतदार यादीवर ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यावर बुधवारी १५ सप्टेंबरला सुनावणी होऊन ...

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या प्रारूप मतदार यादीवर ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यावर बुधवारी १५ सप्टेंबरला सुनावणी होऊन २२ सप्टेंबरला निकाल दिला जाणार आहे. त्यानंतर मतदारयादी अंतिम होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

सांगलीसह राज्यातील १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकाच वेळी ही प्रक्रिया सुरू झाली आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांनी प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे. सांगली जिल्हा बॅँकेच्या प्रारूप मतदार यादीत २ हजार ५७३ मतदार सभासद आहेत. यात २ हजार २१९ संस्था सभासद आहेत. बॅंकेच्या या प्रारूप यादीवर हरकती दाखल करण्यासाठी दि. १३ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीत ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यात सभासद मयत झाल्याबाबत २६, यादीत नाव नसल्याच्या १२, सभासदाने राजीनामा दिल्याची एक, प्रतिनिधीच्या नावावर आक्षेप असल्याच्या चार व इतर सात हरकतींचा समावेश आहे. गट अ मध्ये १२, क १ मध्ये ३, क-२ मध्ये २, क - ३ मध्ये १२ व गट क ४ मधील १२ हरकती आहेत. यावर बुधवारी सुनावणी होऊन २२ सप्टेंबरला निर्णय देण्यात येईल. त्यानंतर २७ सप्टेंबरला मतदारयादी अंतिम केली जाणार आहे.

या हरकतींवर १५ रोजी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांचे कार्यालयात सुनावणी होणार आहे. यासाठी संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. सुनावणीनंतर २२ पर्यंत हरकतींवर निकाल दिला जाणार आहे. २७ रोजी बॅँकेची अंतिम मतदारयादी जाहीर होणार असून त्यानंतर दहा दिवसांत बॅँकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे.