शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अनाथ ४५० बालिकांना मिळाले सांगलीत हक्काचे घर..!

By admin | Updated: January 2, 2017 23:28 IST

मायेचा आधार : भारतीय समाज सेवा केंद्र, वेलणकर अनाथाश्रमने संगोपनातून जोपासली माणुसकी

सचिन लाड ल्ल सांगलीकुणी मुलगी झाली म्हणून झिडकारले... कुणी अनैतिक संबंधातून जन्मली म्हणून टाकून दिले... कुणी अपंग आहे म्हणून सोडली... कुणी सांभाळण्याची ऐपत नाही म्हणून जबाबदारी झटकली... अशा अनेक कारणांनी माता-पिता असूनही अनेकजणी ‘नकुशी’ ठरलेल्या. माता-पित्याच्या अकाली मृत्यूमुळेही अनेकींच्या नशिबी ‘अनाथ’पणाचं जगणं. या ना त्या कारणांमुळे आभाळाच्या छताखाली आलेल्या मुलींना सांगलीतील भारतीय समाज सेवा केंद्र व उद्योगरत्न वि. रा. वेलणकर अनाथाश्रमने मायेचा आधार दिला आहे.भारतीय समाज सेवा केंद्राने तर गेल्या १६ वर्षांत ४५० अनाथ मुलींना दत्तक योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर मिळवून दिले. वेलणकर अनाथाश्रम तर अनाथ मुलींच्या पालनपोषणाबरोबर त्यांची शैक्षणिक जबाबदारीही पार पाडत आहे. मुख्य बसस्थानकाजवळ वेलणकर मुलींचे अनाथाश्रम आहे. सहा ते अठरा वयोगटातील अनाथ मुलींचा येथे सांभाळ केला जातो. मुलींचे राहणे, नाष्टा, जेवण यासह त्यांना शिक्षणही दिले जाते. ८५ क्षमता असलेल्या अनाथाश्रमात सध्या सहा ते १३ वयोगटातील २१, तर १४ ते १८ वयोगटातील १९ मुली आहेत. पूर्वी दीडशे मुली होत्या. पण गेल्या चार-पाच वर्षात हे प्रमाण घटले आहे. या मुली येथे येतात कशा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बहुतांश मुली परराज्यातील आहेत. त्यांना लहान असतानाच बेवारस स्थितीत सोडले जाते. पोलिस मुलींना ताब्यात घेतात. त्यांची चौकशी करतात; मात्र त्यांना मराठी बोलता येत नाही. त्या रडत असतात. शेवटी बाल न्यायाधिकरण समितीच्या आदेशाने मुलींना वेलणकर अनाथाश्रमात सोडले जाते. अनाथाश्रमातील महिला कर्मचारीच मुलींच्या आई बनतात. पंधरा-वीस दिवस मुलींसोबत अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांना वागावे लागते. त्यानंतर या मुली चांगल्याप्रकारे रुळतात. जसं वय वाढलं तशी त्यांना आश्रमाची सवय लागते. वाढत्या वयामुळे त्यांना भूतकाळाचा विसर पडतो. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली की, पुढे मुलींचे राज्यातील कोणत्याही आश्रमशाळेत पुनर्वसन केले जाते.माधवनगर रस्त्यावरील भारतीय समाज सेंवा केंद्रातही शून्य ते सहा वर्षे वयोगटातील अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला जातो. गेल्या १६ वर्षांपासून संस्थेचे हे कार्य सुरू आहे. ५० मुलांचा सांभाळ करण्याची क्षमता असलेल्या या केंद्रात सध्या केवळ १५ मुले आहेत. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात कुठेही नुकतेच जन्मलेले अर्भक सापडले की, त्याचा सांभाळ करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे भारतीय समाज सेवा केंद्र आहे. येथे दाखल होणाऱ्यांपैकी ९५ टक्के मुलीच असतात. प्रमाण घटले : शून्यावर आले!मुलींना झिडकारुन त्यांना बेवारस स्थितीत टाकून देण्याचे प्रमाण अत्यंत कमी आले असल्याचे भारतीय समाज सेवा केंद्रात सध्या दाखल असलेल्या मुलींच्या आकडेवारीवरुन दिसून येते. आॅगस्ट २०१६ मध्ये तासगाव येथे नवजात मुलीला शेतात फेकून दिले होते. पोलिसांमार्फत ही मुलगी केंद्रात दाखल झाली. तेव्हापासून एकही अनाथ मुलगी केंद्रात दाखल झाली नाही. सध्या १५ पैकी चार मुलींना दत्तक घेतले आहे. त्यामुळे केंद्रात अकराच मुले-मुली राहणार आहेत. वैद्यकीय सोयी-सुविधांची उपलब्धता, मुलीच्या जन्माबाबत प्रबोधन, समाजजागृती यामुळे मुलींना जन्मताच बेवारस स्थितीत टाकून देण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. बेवारस मुलगी आली तर पोलिसांच्या मदतीने तिच्या पालकांचा शोध आम्ही घेतो. अनेक प्रकरणात मुलींचे पालक मिळाले आहेत, पण ज्या मुलींचे पालक मिळाले नाहीत, त्यांना नवीन पालक देण्याची जबाबदारी केंद्र शंभर टक्के पार पाडते. दत्तक योजनेतून ज्या मुलींना हक्काचे घर मिळाले आहे, त्यांचा व्यवस्थित सांभाळ सुरू आहे का नाही, याचा आढावा घेत असतो. - सुप्रिया वाटवे, निरीक्षक, भारतीय समाज सेवा केंद्र, सांगली.अनाथ मुली दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. पूर्वी दीडशे मुली असत. आता ही संख्या केवळ २१ वर आली आहे. ज्या मुली आहेत, त्यांचे चांगल्याप्रकारे पालनपोषण केले जात आहे. घरच्या मुलींप्रमाणे त्यांना सांभाळ केला जातो. पण ती अठरा वर्षांची झाली की तिला आश्रमशाळेत सोडताना खूप दु:ख होते. - अनुराधा डुबल, अधीक्षिका, उद्योगरत्न वि. रा. वेलणकर अनाथाश्रम, सांगली.