जिल्ह्यात ३६५ जण कोरोना पॉझिटिव्ह; १५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:21+5:302021-09-05T04:31:21+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येत शनिवारी वाढ होत ३६५ नवीन रूग्ण आढळले. मृत्यू संख्येतही वाढ होत परजिल्ह्यातील दाेघांसह जिल्ह्यातील ...

365 corona positive in the district; 15 killed | जिल्ह्यात ३६५ जण कोरोना पॉझिटिव्ह; १५ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ३६५ जण कोरोना पॉझिटिव्ह; १५ जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येत शनिवारी वाढ होत ३६५ नवीन रूग्ण आढळले. मृत्यू संख्येतही वाढ होत परजिल्ह्यातील दाेघांसह जिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ४५१ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील मृत्यू संख्येत शनिवारी वाढ झाली. जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात तासगाव तालुक्यातील ४, मिरज तालुक्यातील ३, खानापूर, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी २, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

आरोग्य विभागाने शनिवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३,४२६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात १८० जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ४,८४३ जणांच्या नमुने तपासणीतून १९२ जण पॉझिटिव्ह आढळले.

सध्या उपचार घेत असलेल्या २,७७२ जणांपैकी ५८४ जणांची प्रकृती चिंताजनक असून, यातील ४९३ जण ऑक्सिजनवर तर ९१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९३६६९

उपचार घेत असलेले २७७२

कोरोनामुक्त झालेले १८५८०३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५०९४

शनिवारी दिवसभरात

सांंगली ५५

मिरज १३

आटपाडी ३२

कडेगाव ३३

खानापूर ७९

पलूस ७

तासगाव ३५

जत ३०

कवठेमहांकाळ ३१

मिरज तालुका ३१

शिराळा १३

वाळवा ६

Web Title: 365 corona positive in the district; 15 killed