शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यात मोठे पाच आणि छोटे ७९ असे ८४ पाझर तलाव असून, त्यामध्ये सध्या २७४० दशलक्ष घनफूट म्हणजे ...

सांगली : जिल्ह्यात मोठे पाच आणि छोटे ७९ असे ८४ पाझर तलाव असून, त्यामध्ये सध्या २७४० दशलक्ष घनफूट म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन टक्के जादा साठा शिल्लक आहे. आठ तलाव कोरडे पडण्याच्या मार्गवर आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यांतील १७ तलावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातही पाण्यासाठी टँकर सुरू नाहीत.

जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पाचीवाडी, जत तालुक्यातील संख, दोड्डनाला आणि शिराळा तालुक्यातील मोरणा या पाच मोठ्या तलावांमध्ये १७६० दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता आहे. या तलावांमध्ये सध्या ७४४ दशलक्ष घनफूट म्हणजे ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्के जादा पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. छोटे ७९ पाझर तलावांची ६०९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. त्यापैकी सध्या १९९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का कमी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. दि. ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो मान्सूनच्या पावसापर्यंत टिकणे गरजेचे आहे. तासगाव तालुक्यात सात तलाव असून एका तलावात ५० टक्के, सहा तलावांमध्ये २५ ते ५० टक्के, खानापूर तालुक्यातील चार तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त, तर चार तलावांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाळवा तालुक्यात दोन तलाव असून त्यामध्ये केवळ २५ टक्केच पाणीसाठा आहे.

चौकट

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांचा दिलासा

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर दुष्काळी तालुक्यांतील तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. तो टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांमधून तलाव भरल्यामुळे दिसत आहे. तलावांमधील पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचे दिसत आहे.

चौकट

जिल्ह्यातील तलावांतील पाणीसाठा

तालुका तलाव संख्या पाणीसाठी टक्के

तासगाव ७ ४३

खानापूर ८ ३१

कडेगाव ७ ४१

शिराळा ५ २७

आटपाडी १३ ४४

जत २८ २९

क.महांकाळ ११ ४६

मिरज ३ २८

वाळवा २ १५

एकूण ८४ ३५