वारणा धरणात 33.27 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 15:03 IST2019-08-30T15:02:14+5:302019-08-30T15:03:15+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 पर्यंत 33.27 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

33.27 TMC in Varna Dam. Water reservoir | वारणा धरणात 33.27 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 33.27 टी.एम.सी. पाणीसाठा

ठळक मुद्देवारणा धरणात 33.27 टी.एम.सी. पाणीसाठाजिल्ह्यात सरासरी 3.40 मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 पर्यंत 33.27 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

दिनांक 30 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 102.99 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.82 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.79 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.71 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 7.90 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 727 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 15 हजार 991 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 6 फूट 9 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 5 फूट 11 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).

जिल्ह्यात सरासरी 3.40 मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 3.40 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज - निरंक (478.5), जत - निरंक (178.2), खानापूर-विटा 2.6 (310), वाळवा-इस्लामपूर 6.1 (661.5), तासगाव 1.2 (373.7), शिराळा 13.7 (1679.5), आटपाडी - निरंक (184.1), कवठेमहांकाळ 0.2 (281), पलूस 4.5(397.2) व कडेगाव 3.2 (660.2).


 

 

Web Title: 33.27 TMC in Varna Dam. Water reservoir