शिराळा तालुक्यात 31.7 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 19:03 IST2021-07-31T16:22:20+5:302021-07-31T19:03:52+5:30

Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 31.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

31.7 mm in Shirala taluka. The rain | शिराळा तालुक्यात 31.7 मि.मी. पाऊस

शिराळा तालुक्यात 31.7 मि.मी. पाऊस

ठळक मुद्देशिराळा तालुक्यात 31.7 मि.मी. पाऊसवारणा धरणात 60.64 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.2  मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 31.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.3 (476.7), जत 0 (348.5), खानापूर-विटा 1.3 (313.8), वाळवा-इस्लामपूर 19.5 (657.7), तासगाव 2 (385.3), शिराळा 31.7 (1290.2), आटपाडी 0.2 (250)  कवठेमहांकाळ 0.3 (316.9), पलूस 12.7 (513.9 ),  कडेगाव 3.4 (414.9).

वारणा धरणात 30.64 टी.एम.सी. पाणीसाठा

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 30.64 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 88.32 (105.25), धोम  10.19 (13.50), कन्हेर 7.62 (10.10), दूधगंगा  21.33 (25.40), राधानगरी 8.31 (8.36), तुळशी 3.02 (3.47), कासारी 2.07 (2.77), पाटगांव 3.40 (3.72), धोम बलकवडी 3.37 (4.08), उरमोडी 7.39 (9.97), तारळी 5.07 (5.85), अलमट्टी  85.70 (123).

धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 49324, धोम 2586, कण्हेर 3839, वारणा 14389, दुधगंगा 6200, राधानगरी 1400, तुळशी 1521, कासारी 1250, पाटगांव 250, धोम बलकवडी  438 उरमोडी 1986, तारळी 2707 व अलमट्टी 4 लाख 21  हजार 882  क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 23.9 (45), आयर्विन  पूल सांगली  35.6 (45)  व अंकली पूल हरिपूर 41.3 (45.11).

Web Title: 31.7 mm in Shirala taluka. The rain