Sangli: शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना विषबाधा, विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:20 IST2025-01-21T13:19:55+5:302025-01-21T13:20:44+5:30

विटा : येथील साळशिंगे रस्त्यावरील शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार ...

23 students of government residential school poisoned in vita Sangli, treatment underway at Vita Rural Hospital | Sangli: शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना विषबाधा, विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू 

Sangli: शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना विषबाधा, विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू 

विटा : येथील साळशिंगे रस्त्यावरील शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विटा येथे समाजकल्याण विभागाची शासकीय निवासी शाळा आहे. तेथे ९३ विद्यार्थी आहेत. रविवारी त्यांना दुपारी मांसाहारी जेवण व सायंकाळी दूध व कलिंगड असा आहार दिला. रात्री चपाती, आमटी व भात असे जेवण देण्यात आले. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा जुलाब आणि उलट्या होउ लागल्या. सोमवारी सकाळी या प्रकारात वाढ झाली. पोटदुखीही सुरू झाली. त्यामुळे त्यांना अन्नातून विषबाधेची शंका आल्याने शाळा प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केले. याची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी रुग्णालयास भेट दिली. विद्यार्थ्यांवर व्यवस्थित उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. विषबाधेच्या कारणाचा शोध सुरु असून शाळा प्रशासन व जेवण तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद पोलिसांत झालेली आहे.

बाधित विद्यार्थी : सूरज प्रकाश जाधव (वय १६), श्रवणकुमार विठ्ठल बागडे (वय १७), सूरज किसन साठे (वय १५), आदित्य आनंदा रोकडे (वय १६), निर्मल किशोर सावंत (वय १४), स्मित सुभाष झिमरे (वय १२), योगेश बिरुदेव मोटे (वय १३), शुभम प्रकाश माळवे (वय १४), तेजस सचिन काटे (वय १५), आदित्य कैलास लोखंडे (वय १६), आरुष संजय सकट (वय १२),

यश विजय सकट (वय १२), श्रीवर्धन प्रवीण माने (वय ११), प्रज्ज्वल शशिकांत शिंदे (वय १६), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे (वय १३), आयुष नामदेव सावंत (वय १३), संदीप सुदर्शन नातपुते (वय १४), प्रणव सूर्यकांत उबाळे (वय १६), सक्षम तानाजी चंदनशिवे (वय १२), अभिषेक गौतम डोळसे (वय १२, सर्व रा. विटा), तन्मय प्रकाश निकाळजे (वय १४, रा. निमसोड), अक्षय दिनकर सुखदेव (वय १४, रा. आळते), चैतन्य शशिकांत शिंदे (वय १२), हर्षवर्धन सुनील गायकवाड (वय १३, रा. खेराडे).

Web Title: 23 students of government residential school poisoned in vita Sangli, treatment underway at Vita Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.