Sangli: आरवडे येथे २२ मुलांना अन्नातून विषबाधा, आरोग्य विभागाची यंत्रणा गावात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:23 IST2025-01-29T17:22:14+5:302025-01-29T17:23:01+5:30
सांगली : आरवडे (ता. तासगाव) येथील २२ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती कळताच प्रशासन व ...

संग्रहित छाया
सांगली: आरवडे (ता. तासगाव) येथील २२ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती कळताच प्रशासन व आरोग्य विभाग तत्काळ गावामध्ये दाखल झाले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी संतोष पाटील, अन्न भेसळ विभागाचे अनिल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे यांच्यासह अन्य अधिकारी दाखल झाले होते.
एका धार्मिक कार्यक्रमातील शिल्लक राहिलेला भात खाल्ल्याने मुलांना पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, डोके दुखणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. याबाबतची माहिती मिळताच संबधित मुलांच्या कुटुंबाशी संपर्क साधला. आरोग्य विभागाची यंत्रणा रात्री उपचारासाठी गावात दाखल झाली.
बाधित मुलांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थ व पालकांनी गर्दी केली होती.