शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आठवड्यात २00, तर दिवाळीला १९५ रुपये

By admin | Updated: September 29, 2015 23:56 IST

विनय कोरे यांची घोषणा : वारणा साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

वारणानगर : वारणा साखर कारखान्याने गत हंगामातील उसाच्या मोबदल्यापोटी आतापर्यंत प्रतिटन २000 रुपये शेतकऱ्यांना दिले असून, पुढील आठवड्यात २00 रुपये व दिवाळीला १९५ रुपयांचा अ‍ॅडव्हान्स देण्याची घोषणा वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांनी मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ‘बुट’ तत्त्वावर उभारलेल्या ४४ मेगावॅट क्षमतेचा ‘को जनरेशन’ प्रकल्प कारखाना मालकीचा करण्याबाबत संचालक मंडळाला अधिकार देण्याचा निर्णयही घेण्यात आला. येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी वारणा विद्यामंदिरच्या पटांगणावर झाली. त्यावेळी कोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा शोभाताई कोरे होत्या.विनय कोरे म्हणाले, सार्वजनिक वितरणासाठी झारखंड शासनाची एक किलो पॅकिंगमधील साखरेची निविदा वारणा कारखान्यास मिळाली असून, सुमारे सात लाख ७२ हजार क्विंटल साखर पुरविण्याची निविदा वारणेने मिळविली आहे. यामुळे साखरेचा उठाव होण्यास मदत होणार आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठीही त्याची मदत होणार आहे.सध्या साखर कारखानदारीवर भयानक संकट आले असून, शेतकरीही या संकटास खंबीरपणे सामोरे गेले असून साखरेचा उठाव व दर निर्यातीस प्रोत्साहन असे निर्णय केंद्र शासनाने घेतल्यास साखर कारखानदारीस चांगले दिवस येतील. यावेळी शेतकरी शिवाजी भोसले (कोडोली), शंकर शिंदे (बुवाचे वाठार), सर्जेराव पाटील (भादोले), गुंंडू दणाणे (किणी), विश्वास पाटील (कोडोली) या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन गौरव प्राप्त केल्याबद्दल विनय कोरे यांच्या हस्ते गौरव केला.वारणा दूध संघाचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, उपाध्यक्ष विलासराव पाटील, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व्ही. एस. चव्हाण, कायदे सल्लागार अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण उपस्थित होते. सचिव बी. जी. सुतार यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. प्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोले यांनी नोटीस वाचन के ले. दीपक झावरे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आभार मानले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष शिवाजी माने यांनी वारणेने सातारा, कऱ्हाड भागातील ऊस गाळपास न आणता प्रथम कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करावे, अशी मागणी के ली. (वार्ताहर)