वाळवा तालुक्यातील गौंडवाडीत घर फोडून २ लाखांच्या दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 18:58 IST2022-04-11T18:58:21+5:302022-04-11T18:58:51+5:30

इस्लामपूर : गौंडवाडी (ता. वाळवा) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री ते पहाटे दरम्यान घराच्या शेताकडील बाजुचा दरवाजा उघडून घरातील २ ...

2 lakh jewelery stolen from house in Gondwadi in Valva taluka sangli | वाळवा तालुक्यातील गौंडवाडीत घर फोडून २ लाखांच्या दागिन्यांची चोरी

वाळवा तालुक्यातील गौंडवाडीत घर फोडून २ लाखांच्या दागिन्यांची चोरी

इस्लामपूर : गौंडवाडी (ता. वाळवा) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री ते पहाटे दरम्यान घराच्या शेताकडील बाजुचा दरवाजा उघडून घरातील २ लाख रुपये किंमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत रोहित रामचंद्र चव्हाण (वय ३२, सध्या रा. कोडोली, सातारा, मूळ रा. गौंडवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. चव्हाण हे सातारा येथे अभियंता म्हणून नोकरीस आहेत. गौंडवाडी येथील घरी त्यांचे आई-वडिल आणि आजोबा असे तिघे राहण्यास असतात. रविवारी रात्री दहाच्या सुमारास हे तिघे झोपी गेले.

सकाळी सहाच्या सुमारास उठल्यानंतर शेताकडील बाजूचा घराचा दरवाजा कडीतून उचकटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता. कपाटामध्ये ठेवलेले त्यांच्या आई व पत्नीचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये सोन्याचे गंठण, ठुशी, बोरमाळ, बागड्या, कानातील टॉप्स, चांदीचा गोठ चोरीस गेले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 2 lakh jewelery stolen from house in Gondwadi in Valva taluka sangli