सीए परीक्षेत सांगली जिल्ह्यातील १८ विद्यार्थ्यांचा झेंडा, निकालात मुलांची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 19:32 IST2025-07-07T19:31:53+5:302025-07-07T19:32:36+5:30
सांगली : सनदी लेखापाल ( सीए ) परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील १८ विद्यार्थ्यांनी झेंडा फडकविला आहे. ...

सीए परीक्षेत सांगली जिल्ह्यातील १८ विद्यार्थ्यांचा झेंडा, निकालात मुलांची बाजी
सांगली : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील १८ विद्यार्थ्यांनी झेंडा फडकविला आहे. मे महिन्यात ही फाउंडेशन परीक्षा झाली होती.
यशस्वी विद्यार्थी असे : वैष्णवी गोसावी, अनुज कुलकर्णी, केदार बोबडे, पूजा हनगंडी, नरेंद्र स्वामी, अजय पाटील, अर्चना भंडारे, राधिका भणगे, कुणाल शाह, पल्लवी तहसीलदार, राजेंद्र पाटील, फोरम नागदा, प्रतीक फराटे, सोहम जोशी, अनय सखदेव, वैष्णवी हिरवडेकर, राधा नागर, कौस्तुभ खाडिलकर. सांगलीसीए असोसिएशनने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये सीए तथा सनदी लेखापाल परीक्षेत नेहमीच दरवेळेस मुलीच बाजी मारतात असा नेहमीचा अनुभव आहे. पण, या वेळेस मात्र परीक्षेत मुलांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तीर्ण झालेल्यातील काही मुले ए ग्रुप तर काही मुले बी ग्रुपची आहेत. काही मुले ए आणि बी अशा दोन्ही ग्रुपमधील आहेत.
निकालात मुलांची बाजी
सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला.त्यामध्ये जिल्ह्यातील १८ विद्यार्थ्यांनी झेंडा फडकविला आहे. निकालात उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीमध्ये मुर्तीपेक्षा मुलांची संख्या जास्त आहे. त्यातही सांगली आणि मिरज शहर परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय पलूस कसबे डिग्रज आणि ग्रामीण भागातील मुलेही उत्तीर्ण झालेत.