शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: येळावी येथे एसटीच्या अपघातात सतरा जखमी, दैव बलवत्तर म्हणून वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:21 IST

येळावी : येळावी (ता. तासगाव) येथे येळावी-पलूस मार्गावर तासगाव डेपोतील चिंचवड-तासगाव या एसटीचा दुपारच्या दरम्यान अपघात झाला. यात १७ ...

येळावी : येळावी (ता. तासगाव) येथे येळावी-पलूस मार्गावर तासगाव डेपोतील चिंचवड-तासगाव या एसटीचा दुपारच्या दरम्यान अपघात झाला. यात १७ प्रवासी जखमी झाले. जखमींवर येळावीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील तिघांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिलला पाठविण्यात आले आहे.मंगळवार, दि. १७ रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान चालक ए.जे. सुतार व वाहक सुरेश भानुदास शेंडगे (वय ५८, रा.हातनूर) हे चिंचवडहून तासगावकडे एसटी घेऊन जात असताना येळावी येथील पेट्रोलपंपाच्या शेजारील वळणावर ट्रॅक्टरला पास करताना ब्रेक मारल्याने व पावसामुळे रस्त्यावर दलदल झाल्याने एसटीवरील ताबा सुटून ती रानात शिरली. एसटीत एकूण ३२ प्रवासी प्रवास करत होते. यात १७ प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित प्रवाशांवर येळावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून १४ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. तर इतर तिघांना सांगली सिव्हिलला पाठविण्यात आले आहे. सांगली सिव्हिलला पाठवलेल्यांत पूजा संदीप माळी (वय २७, तासगाव), रेश्मा प्रकाश माळी (वय २०, तासगाव), सुमन बबनराव जाधव (वय ५९, पुणे) असून, किरकोळ जखमींमध्ये श्वेता विजय मानकर (वय २१, रा.तासगाव), प्राजक्ता विजय मानकर (वय २४, रा. तासगाव), मनीषा प्रशांत शिंदे (वय ४५, रा.तासगाव), रामसिंग मोहनराव पाटील (वय ४४, रा.तासगाव), राणी अमोल सुतार (वय ३८, रा.पाटण), योगिता रविराज कोकरे (वय ३३, रा. कराड), अनिल शिवलिंग मिरजकर (वय ६२, रा.तासगाव), सीताराम गोपाळ खाडे (वय ६०, रा.किलोस्करवाडी), शालन अण्णा माळी (वय ६०, रा.तासगाव), संदीप अण्णा माळी (वय ३५, रा.तासगाव), मनीषा गणेश पवार (वय ४५, रा.धनगाव), रविराज यशवंत कोकरे (वय ४२, रा.कराड), शोभा प्रकाश मंडले (वय ४३, रा.मिरज) व अनुराधा कुमार सारापुरे (वय ६०, रा.तासगाव) यांचा समावेश आहे.

दैव बलवत्तर म्हणून वाचलेबस गटार पार करून रानात शिरली. ज्या ठिकाणी थांबली तिथून फक्त दोन फुटावर जवळपास पन्नास फुट बाय ४० फुट घेराची विहीर असून, त्या विहिरीला लागूनच दुसरी त्याच क्षेत्रफळाची विहीर आहे. बस अजून दोन फुट जरी पुढे गेली असती तर वेगळा अनर्थ घडला असता. हे दृश्य पाहून अनेक प्रवासी व आलेले नागरिक भीती व्यक्त करत होते.