शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची झुंबड उडाली; सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी १६७८ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:48 IST

काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी घेतले भाजपचे ‘कमळ’ 

सांगली : जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, आष्टा, तासगाव,पलूस, विटा, जत नगर परिषद आणि आटपाडी, शिराळा नगरपंचायतींमधील नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी एक हजार ६७८ तर नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

या निवडणुकीत दिग्गज इच्छुकांना नेत्यांनी बाजूला ठेवले आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने चांगलीच झुंबड उडाली होती. दरम्यान तासगाव नगरपरिषदेसाठी रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना, उद्धवसेनेसह या सर्वांच्यात जागा वाटपाबाबत विलंब होत असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली होती. अर्ज दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप व काँग्रेस यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. बहुतांशी विद्यमान नगरसेवकांना यंदा डच्चू देण्यात आला आहे. जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज अखेर नगरसेवकसाठी १५४ उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्षपदासाठी एकूण १० उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उतरविले आहे. भाजपकडून रवींद्र आरळी, तर राष्ट्रवादीकडून सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांचा अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी महायुती, महाआघाडीत बिघाडी झाली असून, दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. पलूस अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवार आणि नेत्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी ०९ जणांनी, तर नगरसेवक पदासाठी १४३ अर्ज दाखल केले. उरूण-ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण नगराध्यक्षपदासाठी १४, तर नगरसेवकपदासाठी २७२ अर्ज आले. या ठिकाणीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. शिराळ्यात नगरसेवक पदासाठी १७६, तर नगराध्यक्ष पदासाठी १७ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केलेल्यामध्ये अपक्ष उमेदवार आणि तरुण उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. आष्टा नगराध्यक्षपदासाठी आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल शिंदे, महायुतीचे प्रवीण माने यांच्यासह ११ उमेदवार, तर नगरसेवकपदासाठी २०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आटपाडी नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक होणार असून, चुरशीने नगरसेवक पदासाठी १९७, तर नगराध्यक्षपदासाठी २३ अर्ज दाखल झाले. तासगाव तालुक्यात रात्री साडेआठ वाजेपर्यंत उमदेवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया चालूच होती. आज अखेर दाखल झालेले उमेदवारी अर्ज नगर परिषद / नगरपंचायत : सदस्यासाठी अर्ज : नगराध्यक्षपदासाठी अर्ज 

  • उरूण-ईश्वरपूर /२७२/१४
  • विटा /२३०/१४
  • आष्टा /२०६/११
  • जत /१५४/१०
  • पलूस /१४३/०९
  • शिराळा /१७६/१७
  • आटपाडी /१९७/२२
  • तासगाव /१९०/१३

काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी घेतले भाजपचे ‘कमळ’ विटा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षांतील दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही उमेदवार मिळाला नाही. काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी भाजपचे ‘कमळ’ हातात घेतले आहे.

आज अर्जाची छाननीमंगळवार, १८ रोजी सकाळी १० वाजता या अर्जांची छाननी सुरू होईल आणि सायंकाळी ६ पर्यंत अवैध अर्ज काढले जातील. तर, बुधवार, १९ ते २१ या काळात उमेदवारी मागे घेण्याची मुदत राहील, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rush to File Nominations in Sangli District Local Elections

Web Summary : Sangli district saw a rush for local election nominations. 1678 applications were submitted for 189 councilor seats across eight municipalities. Many incumbents were sidelined. Scrutiny begins today.