Water shortage: सांगली जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये १०९ टँकर प्रस्तावित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:19 IST2025-04-09T13:18:27+5:302025-04-09T13:19:00+5:30
टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना; नागरिकांच्या मागणीनुसार तत्काळ टँकर मिळणार

Water shortage: सांगली जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये १०९ टँकर प्रस्तावित
सांगली : जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. म्हणून प्रशासनाने आटपाडी, जत, मिरज, शिराळा आणि तासगाव तालुक्यांसाठी १०९ पाण्याचे टँकर लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार आराखडा तयार केला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार टँकर सुरू करणार असून मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आटपाडी तालुका १२ टँकर, जत ९३, मिरज १, शिराळा २ आणि तासगाव तालुक्यात एका टँकरची गरज आहे. त्यानुसार तहसीलदारांना नागरिकांची मागणी आल्यानंतर तत्काळ तेथील परिस्थिती पाहून टँकर सुरू करण्याची सूचना दिली आहे. सध्या कुठेही टँकरची मागणी नाही.
अशी आहे टँकरची प्रस्तावित गरज
तालुका - टँकर संख्या
- आटपाडी - १२
- जत - ९३
- मिरज - ०१
- शिराळा - ०२
- तासगाव - ०१
- एकूण - १०९