शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘१०३’ हेल्पलाईन क्रमांक बंद

By admin | Updated: November 25, 2015 00:32 IST

महिला अत्याचारविरोधी दिन : सांगली, मिरजेत दोन महिला पथके; स्वतंत्र ‘हेल्पलाईन’ यंत्रणा--स्टिंग आॅपरेशन

सचिन लाड --सांगली--राज्य शासनाने महिलांविरुद्धचे अत्याचार रोखण्यासाठी सुरु केलेला ‘१०३’ हा हेल्पलाईन क्रमांक जिल्ह्यात बंद आहे. तो सुरु करण्यात आला नाही. तसेच १०३ हेल्पलाईन क्रमांकाची अनेक पोलीस अधिकाऱ्यांना माहितीच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून उघडकीस आले आहे. पण गेल्या चार-पाच वर्षापासून सांगली पोलिसांनी समांतर यंत्रणा राबवून ‘१०९१’ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. यावर तक्रारी येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्या वर्षभरात केवळ ४२ तक्रारी आल्या आहेत. देशभरात २५ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला अत्याचारविरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. महिलांच्या मदतीसाठी राज्य शासनाने १०३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. यावर संपर्क साधल्यानंतर पोलीस दखल घेतात का? ते किती वेळात तक्रारीचे निरसन करतात? बोगस तक्रारींचे प्रमाण आहे का? हा क्रमांक जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले आहेत का? आदी मुद्यावर ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. स्वतंत्र महिला पथक : गर्दीच्या ठिकाणी गस्त ‘१०९१’ या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी सांगली आणि मिरज या दोन्ही शहरात स्वतंत्र महिला गस्त पथकाची नियुक्ती केली आहे. एक महिला पोलीस उपनिरीक्षक व चार महिला पोलीस शिपाई असे पाचजणांचे हे पथक आहे. त्यांना स्वतंत्र वाहन दिले आहे. या वाहनावर चालकाची जबाबदारी महिला पोलीसच पार पाडत आहेत. शहरातील गर्दीची ठिकाणे, महाविद्यालयात, आठवडा बाजार याठिकाणी पथकाची सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत गस्त सुरु असते.स्वतंत्र महिला पथक : गर्दीच्या ठिकाणी गस्त ‘१०९१’ या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी सांगली आणि मिरज या दोन्ही शहरात स्वतंत्र महिला गस्त पथकाची नियुक्ती केली आहे. एक महिला पोलीस उपनिरीक्षक व चार महिला पोलीस शिपाई असे पाचजणांचे हे पथक आहे. त्यांना स्वतंत्र वाहन दिले आहे. या वाहनावर चालकाची जबाबदारी महिला पोलीसच पार पाडत आहेत. शहरातील गर्दीची ठिकाणे, महाविद्यालयात, आठवडा बाजार याठिकाणी पथकाची सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत गस्त सुरु असते.कॉलची घेतली जातेय दखलपोलिसांनी समांतर यंत्रणा राबवून सुरु केलेल्या ‘१०९१’ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला तरी, त्याची तातडीने दखल घेतली जाते. कॉल कोणी केला? त्याचे नाव काय? कुठे घटना घडली आहे? याविषयी माहिती घेतली जाते. विशेषत: महिला व तरुणी छेडछाडीच्या तक्रारी प्राप्त होतात. वर्षभरात ४२ तक्रारीहेल्पलाईनवर गेल्या वर्षभरात अंदाजे ४२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी महिला अत्याचारविरुच्या आहेत. यामध्ये छेडछाड, कौटुंबिक कारणावरून छळ, बेवारस वृद्धा रस्त्यावर बेशुद्ध पडली आहे, या विषयांच्या तक्रारी आहेत. हा क्रमांक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात जोडण्यात आला आहे. तक्रारी आली की त्याची माहिती महिला दक्षता पथकास दिली जाते. हे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तक्रारीची दखल घेऊन पुढील कार्यवाही करते. पिडित महिलेस तक्रार देण्यास सांगून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली जाते.बोगस तक्रारी नाहीतहेल्पलाईनवर बोगस तक्रारींचे प्रमाण नगण्य आहे. कारण १०९१ हा क्रमांक सुरू असल्याची माहिती लोकांना नाही. पोलिसांनी या क्रमांक माहिती व्हावी, यासाठी फारसे विशेष प्रयत्न केले नाहीत. पोलीस ठाण्यात मात्र क्रमांक सुरू असल्याची माहिती सांगणारे फलक लावण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात कामानिमित्त जाणाऱ्या लोकांनाच हा क्रमांक सुरू असल्याचे नजरेस पडते. तसेच महिला दक्षता पथकाच्या वाहनांवर क्रमांक लावण्यात आला आहे.महिला अत्याचाराविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कक्ष आहेत. या कक्षात महिला पोलिसांची नियुक्ती केली आहे. येथे केवळ कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी प्राप्त होतात. आलेल्या तक्रारींची तातडीने दाखल घेतली जाते. पिडित महिला व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयितांना बोलावून घेतले जाते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. पिडित महिलेचा संसार मोडू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. यातून त्यांच्यात समझोता न झाल्यास पिडित महिलेची तक्रार घेऊन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो.क्रमांकच सुरु नाहीराज्य शासनाने सुरु केलेला १०३ हेल्पलाईन क्रमांक बंद आहे. तो सुरु केला होता का नाही, याबद्दल कुणाकडे ठोस माहिती नाही. अनेक पोलीस अधिकाऱ्यांना या क्रमांकाची माहिती नाही. महिला अत्याचाराविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी सांगली पोलिसांनी यापूर्वीच ‘१०९१’ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. हा क्रमांक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी जोडण्यात आला आहे.