‘चीट डे’च्या दिवशी मग त्याने खाण्यापिण्याची सगळी कसर पूर्ण केली. एक स्टेक, 4 साईड पोटॅटो व्हेजी, मॅकेरॉनी चीज, तीन डेझर्ट, ब्रेड-बटर, ब्रिक ओ जीच आणि कॅव्हिएर (स्टर्जन माशाची खारवलेली अंडी) असे तीन जाणांना पुरेल एवढे जेवण केले.झॅक तर दिसला... आता प्रियंकाचे लाईफगार्ड कॉस्ट्यूम फोटो कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.#Cheatday ! Devoured a steak, 4 side potatoes/veggies, macncheese, 3 desserts, bread/butter, brick o cheese & caviar pic.twitter.com/q9hXSoq4us— Zac Efron (@ZacEfron) 9 March 2016
झॅक अॅफ्रॉनचे ‘सुपरहॉट’ अॅब्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 08:08 IST
झॅक अॅफ्रॉनने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सेटवरील ‘सुपरहॉट’ फोटोज् शेअर केले आहेत. सोबत पीळदार शरीर कमावण्यासाठी त्याने कसा घाम गाळला, कोणता डाएट घेतला याची माहितीदेखील पोस्ट केली.
झॅक अॅफ्रॉनचे ‘सुपरहॉट’ अॅब्ज
नव्वदच्या दशकात ‘बेवॉच’ने तमाम तरुणांना वेडे लावले होते. लॉस एंजलिस कॉऊंटी बीचवरील लाईफगार्डस्च्या दैनंदिन जीवनावर आधारित या मालिकेले लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडित काढले. सर्वात पाहिल्या गेलेल्या मालिकांपैकी एक म्हणून तिची गणना होते.आता या मालिकेवर आधारितच चित्रपट येतोय. त्यात आपली ‘देसीगर्ल’ प्रियंका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासह ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि हॉलिवूड थ्रॉब झॅक अॅफ्रॉन प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.आता ‘बेवॉच’ म्हटल्यावर तुमचे शारीरिक सौंदर्य तर दिसलेच पाहिजे.झॅक अॅफ्रॉनने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सेटवरील ‘सुपरहॉट’ फोटोज् शेअर केले आहेत. सोबत असे पीळदार शरीर कमावण्यासाठी त्याने कसा घाम गाळला, कोणता डाएट घेतला याची माहितीदेखील पोस्ट केली आहे. नऊ दिवस कार्बोहाड्रेटस् फूड (कार्बोदके) आणि साखरेचा एक दाणाही त्याने घेतला नाही. फक्त आॅरगॅनिक ग्रास, फ्री रेंज प्रोटिन आणि आॅरगॅनिक ग्रीन लीफ असे संतुलित पण कठोर डाएटचे पालन त्याने केले.आता एवढी मेहनत घेतल्यावर त्याचे फळ तर त्याला मिळणारच ना! एक दिवसाची सूटसुद्धा तो डिझर्व करतो.