ऑफिस पार्टीनंतर फोन उचलत नव्हती महिला, पतीला आला भलताच संशय; दिली 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 06:54 PM2022-04-03T18:54:47+5:302022-04-03T18:56:46+5:30

दाम्पत्यांमध्ये एकमेकांवर संशय घेण्याची वृत्ती वाढताना दिसते. अनेकांना आपल्या पार्टनरवर विश्वास नसतो. काहीजण एकमेकांशी बोलून यावर उपाय शोधतात, तर काही जण तज्ज्ञांचा सल्ला घेतात.

wife busy in office party man suspects cheating | ऑफिस पार्टीनंतर फोन उचलत नव्हती महिला, पतीला आला भलताच संशय; दिली 'ही' शिक्षा

ऑफिस पार्टीनंतर फोन उचलत नव्हती महिला, पतीला आला भलताच संशय; दिली 'ही' शिक्षा

Next

पती आणि पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. पती-पत्नीत एकामेकांशी वाद आणि छोटीमोठी भांडणं होत असतात, पण एकमेकांवर विश्वास असेल तर त्या भांडणाचा परिणाम होत नाही. अलीकडे दाम्पत्यांमध्ये एकमेकांवर संशय घेण्याची वृत्ती वाढताना दिसते. अनेकांना आपल्या पार्टनरवर विश्वास नसतो. काहीजण एकमेकांशी बोलून यावर उपाय शोधतात, तर काही जण तज्ज्ञांचा सल्ला घेतात.

अशाचा एका प्रकरणातील पतीला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबध (Extra Marital Affair) असल्याचा संशय आहे. त्या व्यक्तीने सांगितले की, ‘आमच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. मी ३५ वर्षांचा आहे आणि पत्नीचे वय ३१ आहे. याशिवाय आम्हाला एक २ वर्षाचा मुलगाही आहे. एकदा माझी पत्नी एका ऑफिस पार्टीला गेली होती; पण पार्टीनंतर ती घरी आली नाही. त्यामुळे मला वाटतं की तिचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर आणि शारीरिक संबंध आहेत.’

आपल्या पत्नीबद्दल सांगताना त्या व्यक्तीने सांगितले की, ‘त्याची पत्नी अभ्यासात खूप हुशार आहे, त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिला बँकेत नोकरी मिळाली. तिने तिच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती केली, यश मिळवलं आणि आता ती माझ्यापेक्षा जास्त कमावते. बाळ जन्माला आले तेव्हापासून मी त्याची काळजी घेतो आहे आणि माझी पत्नी ऑफिसला जायची. नंतर तिने आधीची नोकरी बदलली आणि ती मोठ्या बँकेत रुजू झाली. तिला नवीन बँक खूप आवडली, तिथे बरेच मित्र बनवले. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की नवीन बँकेत गेल्यानंतर ती माझ्यापासून दूर जाऊ लागली. दुरावा तर आलाच शिवाय तिने जिमची मेंबरशिप (Gym Membership) घेतली. अचानक तिला तिच्या दिसण्याबद्दल आणि शरीरयष्टीबद्दल खूप काळजी वाटू लागली. तिने व्यायाम आणि डाएट करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे, मी सतत घरीच असल्याने माझे वजन खूप वाढले आहे.’

नंतर त्या व्यक्तीने सांगितले की, एके दिवशी माझी पत्नी ऑफिस पार्टीला गेल्यानंतर मी तिला फोन केला, पण तिने एकदाही फोन उचलला नाही. यानंतर तिने मला मेसेज केला ज्यात लिहिलं होतं की मी खूप दारू प्यायली आहे आणि एका मित्रासोबत सोफ्यावर पडणार आहे. तिच्या बोलण्याने मला धक्का बसला असून त्यावर मला विश्वास नाही. शिवाय तिला माझं वजन खूप वाढलं असल्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत, असं तिने सांगितलं. दरम्यान, अलीकडेच माझ्या पत्नीने आमच्या नातेसंबंधावर काम करण्याची गरज असल्याचं कबूल केलं.’

तज्ज्ञांचा सल्ला काय?
तज्ज्ञ म्हणतात की, ‘एका घटनेनंतर तुम्ही तुमच्या पत्नीविषयी असं मत बनवणं योग्य नाही. तुम्हा दोघांच्या प्रायॉरिटी वेगळ्या आहेत. तुमची पत्नी तिच्या करिअरवर फोकस करत आहे, तर तुमची प्रायॉरिटी (Priority) तुमचं मूल आहे, ज्याला तुमची खूप गरज आहे. तुम्ही दोघंही आपलं काम खूप चांगलं करताय, यासाठी तुमचं कौतुक करायला हवं. पण दोघांनाही येणाऱ्या अडचणीबद्दल तुम्ही एकमेकांशी बोलायला हवं. सर्वांत महत्वाचं म्हणजे तुमच्या पत्नीचे अनैतिक संबंध (Affair) असल्याचा तुम्हाला केवळ संशय आहे. ती तुमची फसवणूक करत असल्याचा कोणताही पुरावा तुमच्याकडे नाही. अशा वेळी कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांसाठी वेळ काढून आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवा. यामुळे तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.'

Web Title: wife busy in office party man suspects cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.