अलिकडे सोशल मीडिया आणि डेटिंग एप यांमुळे रिलेशनशिप फारसं टिकत नाही. नात्यात प्रेम कमी  गैरसमज जास्त होत असतात. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. अनेकदा लग्न झाल्यानंतर पतीचे बाहेर अफेअर असणं, किंवा पत्नीचं इतर पुरूषांवर प्रेम असणं अशा घटना घडत असतात.  अनेकदा आपल्या पतीने खोट बोलून दगा दिला आहे. याची कल्पना असताना सुद्धा महिला आपल्या पतीला माफ करतात. आज आम्ही तुम्हाला महिला आपल्या चिटर असलेल्या पतीला का माफ करतात. याबाबत सांगणार आहोत.

माहेरी जावं लागतं

भारतीय समाजात  मुलींना लग्न झाल्यानंतर माहेरचं घर परकं होतं.  ज्या घरात लग्न करून जात असते. तेच तिचं घर असतं. म्हणून पतीशी नाराज होऊन मुलींना जास्त दिवस माहेरी राहायला आवडत नाही. अशात मुली आपल्या कुंटूंबाबद्दल विचार करून पतीला माफ करतात. 

नातं तोडायचं नसतं

अनेकदा गैरसमजांमुळे नाती तुटतात.  पार्टनरकडून चूक झाल्यानंतर पती आपल्या पत्नीला चुकीबद्दल माफी मागत असतो. कोणत्याही प्रकारे पार्टनरने सोडून जाऊ नये. यासाठी प्रयत्न करत असतो.  कारण चूक झाल्यानंतर व्यक्तीला  दुसरा चान्स हवा असतो. त्यात  काही गैर नाही. म्हणून पत्नी आपल्या पतीशी थेट नातं तोडण्यापेक्षा दुसरा चान्स देतात.      

मुलांची  काळजी

मुलांची जबाबदारी आई-वडील दोघांवरही असते. अशात पतीकडून धोका मिळाल्यानंतर मुलांना  सांभाळण्याची जबाबादारी एकट्या स्त्रीवर येते.  त्यामुळे पतीशिवाय राहिल्याने मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम घडून येत असतो. म्हणून आपल्या पतीला  महिला चूक असताना सुद्धा माफ करतात.

लोक काय म्हणतील

महिलांना नेहमी  समाजातील लोकांची भीती असते. आपल्या दगाबाज पतीचे अफेअर लोकांसमोर येऊ नये असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद जर चार भिंतींच्या बाहेर गेला तर अब्रु राहणार नाही, लोक वाटेल ते बोलतील असा विचार करून महिला आपल्या पार्टनरला माफ करतात. 

Web Title: why women forgive their cheating husband relationship tips myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.