सध्याच्या काळात लग्न करण्यासाठी सुध्दा आणि घटस्फोट घेण्यासाठी खूप घाई केली जाते. कारण निर्णय तडकाफडकी आणि रागाच्या भरात घेतले जातात. जर तुम्ही सुध्दा लग्नाचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल. लग्नात दोन मनं जोडली जात असतात. काही वेळा अशी परिस्थीती येत असते. तेव्हा लव्ह मॅरेज असो अथवा अरेंज मॅरेज सुरूवातीला  होकार न देणं. हा सर्वात उत्तम पर्याय असतो. 

जर तुम्ही लग्नाला तुमच्या घरच्यांच्या सांगण्यावरून होकार देत असाल. तर कालांतराने ही गोष्ट महागात पडू शकते. अनेकदा अशा नात्यांमध्ये दूरावा येण्याची शक्यता असते. कारण ईच्छा नसताना दिलेला होकार हा नात्यांमध्ये येणाऱ्या समस्येचं कारण ठरू शकतो. 

सध्याच्या काळात मुलं आणी मुली  आपल्या करीअरच्या बाबतीत खूप जागरूक असतात. पण जेव्हा लग्नाचा विचार येतो. तेव्हा अनेक मुली आपल्या शिक्षणाशी तडजोड करतात. जर तुम्हाला लग्नानंतरही पुढे शिकण्याची इच्छा असेल. आणि या गोष्टीला जोडीदाराची किंवा त्याच्या घरच्यांची संमती नसेल तर या लग्नासाठी होकार देऊ नका.

तुम्ही जर लग्नासाठी मुलगा निवडत असाल. तर त्याआधी त्यांचे मित्र कसे आहेत हे लक्षात घेणं. गरजेच आहे. कारण संगतसोबत योग्य नसल्यामुळे अनेक संसार तुटले आहेत. म्हणून त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचे व्यसन आहे का असल्यास किती प्रमाणात आहे. य़ाची माहिती घ्या. जर तुम्ही लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार असाल तरच  लग्नासाठी होकार द्या .

Web Title: When you should not say yes to the marriage or wedding proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.