मुलांची जास्तच काळजी करताय का? जाणून घ्या याचे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 16:46 IST2018-11-07T16:45:40+5:302018-11-07T16:46:23+5:30
आपण अनेकदा पॅरेंटिंग हा शब्द वापरतो किंवा ऐकतो. पण अनेकदा पॅरेंटिंग म्हणजे नक्की काय? याचा खरा अर्थ म्हणजे, मुलांच्या पालन पोषणसाठी जी पद्धत वापरण्यात येते त्याला पॅरेंटींग असे म्हणतात.

मुलांची जास्तच काळजी करताय का? जाणून घ्या याचे नुकसान!
(Image Creadit : Best Cell Phone Spy Apps)
आपण अनेकदा पॅरेंटिंग हा शब्द वापरतो किंवा ऐकतो. पण अनेकदा पॅरेंटिंग म्हणजे नक्की काय? याचा खरा अर्थ म्हणजे, मुलांच्या पालन पोषणसाठी जी पद्धत वापरण्यात येते त्याला पॅरेंटींग असे म्हणतात. पॅरेंटिंग शब्दाचा उपयोग करणं हा शहरी भागामध्ये एक सामान्य विषय बनला आहे. अनेकदा थोरामोठ्यांच्या तोंडून, 'आम्ही नाही बाबा आमच्या मुलांचे असे लाड पुरवले.' किंवा 'मुलांकडे लक्ष द्या रे.' असे सल्ले अनेकदा ऐकतो. कधीकधी त्यांच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून विषय कानामागे टाकतो. सध्या अनेकदा पॅरेंटिंगबाबत सल्ले घेण्यासाठी अनेक पालक काउंन्सिलरकडे जातात.
शहरी भागांमध्ये पॅरेंटिंगबाबत एक नवी समस्या समोर येते. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमध्ये नेहमी आपण शिक्षकांच्या तोंडून ऐकतो की, अनेक मुलं ओव्हर प्रोटेक्टिव्ह पॅरेंटिंगची शिकार होत आहेत. अनेक लोक याला हेलिकॉप्टर पॅरेंटिंग असं देखील म्हणतात. याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, मुलांच्या पालनपोषणामध्ये ओव्हर प्रोटेक्टिव्ह पॅरेंटिंग फार घातक आहे. यामुळे बरीच मुलं घाबरून पालकांच्या दहशतीखाली येतात. त्याचप्रमाणे त्यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता देखील नष्ट होते. याव्यतिरिक्त अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊयात ओव्हर प्रोटेक्टिव्ह पॅरेंटिंगचा लहान मुलांवर होणाऱ्य़ा परिणामांबाबत...
ओवर प्रोटेक्टिव पेरेंटिंगचा लहान मुलांवर होणारा परिणाम :
ओवर प्रोटेक्टिव पॅरेंटिंगचा लहान मुलांवर सर्वात वाईट परिणाम होतो. अनेकदा मुलं घाबरून आईवडिलांकडून अनेक गोष्टी लपवू लागतात. कारण त्यांना वाटतं की, त्यांनी आई-वडिलांना जर काही गोष्टी सांगितल्या तर त्यांना ते अनेक प्रश्न विचारतील किंवा रागावतील. त्यांच्या मनात आई-वडिलांबाबत भिती निर्माण होते. यामुळे अनेकदा काही मुलं वाईट मार्गाने जातात.
ओवर प्रोटेक्टिव पॅरेंटिंगमुळे होणारे नुकसान
ओवर प्रोटेक्टिव पॅरेंटिंगमुळे सरळ मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होतो. कारण त्यांच्या स्वभावात सतत बदल घडतात. ओवर प्रोटेक्टिव पॅरेंटिंगमुळे काही मुलांमध्ये भीती निर्माण होते. त्यांना सतत काळजी करणाऱ्या व्यक्तीची सोबत लागते. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत.
मुलांच्या व्यक्तिमत्त्वासोबतच त्यांच्यात सेल्फ कॉन्फिडन्सच राहत नाही. ते एखाद्या परिस्थितीत निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच पालकांनी त्यांच्यावर जास्त दबाव टाकल्यामुळे ते घाबरून कोणतीच गोष्ट व्यवस्थित करत नाहीत.
जर तुमची मुलं नेहमी तुम्हाला एखाद्या गोष्टीवर ओरडण्यासाठी विरोध करत असतील तर त्यांना थोडीशी मोकळीक द्या. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्ही पालक म्हणून त्यांना सल्ला द्या. परंतु त्यांच्यावर एखाद्या गोष्टीची जबरदस्ती करू नका. असं म्हणतात की, जेव्हा माणून चुका करतो त्या चुकांमधूनच तो शिकतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या चुकांमधूनही शिकू द्या.