(Image Credit : guycounseling.com)

आजकाल नात्यातील भावनात्मकता जवळीकता कमी होत जात आहे आणि जास्तीत जास्त नात्यांचा आधार केवळ शारीरिक आकर्षण हाच राहिलाय. अलिकडे नातं केवळ बाहेरील सुंदरता बघून तयार होतं आणि लोक नातं निभावण्यात विश्वास ठेवत नाहीत. अशाच एक विश्वासू व्यक्ती शोधणं कठीण काम आहे. 

त्यामुळे तुम्ही पार्टनर असा शोधला पाहिजे जो तुम्हाला तुमच्या लूकपेक्षा जास्त पसंत करेल. जर एखादा पुरूष तुम्हाला तुमच्या सुंदरतेपेक्षा तुमच्या स्वभावाला अधिक पसंत करत असेल, तर तुम्ही त्याला आयुष्यातून जाऊ देता कामा नये. चला जाणून घेऊ पुरूषाकडून मिळणारे असे काही संकेत की, तो तुमच्या सुंदरतेपेक्षा जास्त तुम्हाला पसंत करतो.

तुमच्या कामाप्रति प्रेमाचं कौतुक करत असेल

(Image Credit : lovepanky.com)

तुमच्या सुंदरतेपेक्षा तुमच्या आणखीही किती चांगल्या गोष्टी असल्याचं तो तुम्हाला सांगत असेल. जसे की, तुमची काम करण्याची पद्धत. तुम्ही तुमच्या कामाबाबत कशाप्रकारे शिस्त पाळता, हे त्याला पसंत असणे.

त्याच्या प्लॅनिंग आणि उद्देशाबाबत तुम्हाला सांगणं'

(Image Credit : dailymail.co.uk)

पुरूष त्याच्या लक्ष्य आणि उद्देशांबाबत प्रत्येकासोबत शेअर करत नाहीत. आणि जर ती व्यक्ती त्याच्या या गोष्टी तुम्हाला सांगत असेल याचा अर्थ हा होतो की, तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल आहात आणि तो तुम्हाला पसंत करतो.

अशा गोष्टी ज्यामुळे त्याला तुमची आठवण येते

(Image Credit : zoosk.com)

हा स्पष्ट संकेत आहे की, तो तुमच्याविषयी विचार करतो. जर त्याने तुम्हाला सांगितले की, काही सामान्य गोष्टींमुळेही त्याला तुमची आठवण येते, तर याकडे दुर्लक्ष करू नका.

तुमच्या आवडी-निवडी विचारणे

(Image Credit : glamour.com)

तो तुमच्यासोबत त्याच्या गोष्टी शेअर करतो आणि तुमच्याबाबतही जाणून घेत असेल तर तो हे दोघांना जवळ आणण्यासाठी करतोय. तो तुम्हाला पसंत करत असेल तर विचारेल की, तुम्हाला आयुष्यात काय करायचंय किंवा तुम्हाला कशात आवड आहे.

त्याला कशाची भीती वाटते हे तुम्हाला सांगणं

जर कोणताही पुरूष तुम्हाला सांगत असेल की, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती काय आहे आणि त्याला कोणत्या गोष्टींबाबत असुरक्षित वाटतं. तर हे समजून घ्या की, त्याला त्याच्या आयुष्याबाबत तुम्हाला सांगायचं आहे.  कारण तो तुम्हाला पसंत करतो.

Web Title: What are the things man says when he likes you more than your looks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.