Valentines day : 'ती नाही म्हणाली' किंवा 'त्याने नकार दिला' तर कसं पचवाल दुःख?... 'या' टिप्स फायदेशीर ठरतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 15:33 IST2020-02-14T16:16:02+5:302020-02-15T15:33:32+5:30
आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे अनेक कपल्स फार आनंदात आहेत.

Valentines day : 'ती नाही म्हणाली' किंवा 'त्याने नकार दिला' तर कसं पचवाल दुःख?... 'या' टिप्स फायदेशीर ठरतील!
आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे अनेक कपल्स फार आनंदात आहेत. नेहमीच आपल्या पार्टनरसोबत चांगला टाईम स्पेंड करावा असं सगळयांना वाटत असतं. अनेकदा आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांना रिलेशनशिपमध्ये यावस वाटतं. पण नेहमीच मुलींकडून त्यांना होकार मिळेल असं नाही. अनेकदा आयुष्यात नकाराचा सामना सुद्धा करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला आवडत्या व्यक्तीकडून नकार मिळाला तर तो कसा पचवायचा हे सांगणार आहोत.
(image credit- semmecards)
ओव्हरपजेसिव्हनेस होऊ नका-
(image credit-devorced moms)
दुसरी व्यक्ती आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यास मनात विचारांचं काहूर माजतं. मेंदूची विशिष्ट रसायनं साथ देत नाहीत. विवेकबुद्धीने विचार होत नाही. आपला अपमान झाला, या विचारानं इगो हर्ट होतो. तिरस्कराची भावना निर्माण होते. संशयी, हिंसक वृत्ती वाढते. तिला प्रेमाची किंमत नाही. या विचारांनी तो बदल्याच्या भावनेत जातो. जोपर्यंत तिला धडा शिकवत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. चूक समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ओव्हर पझेसिव्हनेसमुळे हे घडतं. समोरच्या व्यक्तीवर माझाच हक्क या वृत्तीमुळे नात्यात कोंडी निर्माण होते.
नकारामागचं कारण लक्षात घ्या-
जर तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून नकार मिळाला तर she is not my cup of tea असा विचार करून निराश होऊ नका. त्या मुलीचा आधी कोणी बॉयफ्रेंड आहे का? तीला कोणी इतर व्यक्ती आवडते का ? कशाप्रकारे लोक त्या व्यक्तीला आवडतात. तिच्या अपेक्षा काय आहेत. हे लक्षात घ्या. तुम्ही तिच्या नकाराने स्वतःला कितीही त्रास करून घेतला तरी तो तिच्या पर्यंत पोहोणार नसतो. त्यामुळे स्वतःची मानसिक स्थिती खराब होईल असं वागू नका. तसंच तिला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करण्याचा प्रयत्न करू नका.
(image credit-flickr)
जर तुम्हाला नकार मिळाल्यानंतर तुम्ही त्या मुलीला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुमची प्रतिमा तिच्या मनात नकारात्मक होऊ शकते. हे. एकतर्फी प्रेमात समोरच्याकडून होकार मिळत नसेल तर थोडे मागे जाऊन विचार करायला हवा. एका नकाराने जग थांबत नाही. विवेकबुद्धी, थोडे भावनिक प्रयत्न हे प्रेमासाठी योग्य ठरू शकतात. तिने नकार दिला. का दिला? हे जाणून घ्या. ती किंवा तो. अडचण समजून घ्या. प्रत्येकाला स्वत:ची आवडनिवड ठरविण्याचा अधिकार आहे. आपण तो जबरदस्तीने मिळविण्याचा प्रयत्न करू नये.
सकारात्मक विचार असायला हवेत-
(image credit-pinterest)
तिलाही आपण आवडत असू हे गृहीत धरणं फार चुकीचं आहे. एखाद्या मुलीकडून नकार मिळाल्यानंतर सगळयात आधी तुम्हाला तुमचे विचार हे सकारात्मक ठेवायला हवेत. कारण जर तुम्ही नकाराच्या दुखात स्वतःला त्रास करून घ्याल तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला फारसा उत्साह येणार नाही. पुन्हा तुमच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकतं. त्यामुळे खचून जाऊ नका. ( हे पण वाचा-म्हणून लग्न करताना पार्टनर वयाने मोठा असावा...)
स्वतःचं परिक्षण करा-
जर तुम्ही एखाद्या कामात सक्सेस होत नसाल तर नाराज होऊ नका. स्वःपरिक्षण करा. त्यातुन तुमच्यात काय कमी आहे. काय इंप्रुव्ह् करायला हवं. हे आधी लक्षात घ्या. मग त्या दृष्टीने स्वतःवर मेहनत घ्या. खचून जाऊ नका. कारण खचल्यानंतर तुम्ही मानसिकदृष्या खुप कमकुवत होत असता. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ( हे पण वाचा-पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!)