शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्याच्या’शी किंवा ‘तिच्या’शीच लग्न करायचंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 13:30 IST

..पण तत्पूर्वी या सात गोष्टी नक्की समजून घ्या.

ठळक मुद्देभिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आपल्याला वाटणारी ओढ आणि आकर्षण हे शरीरातल्या रसायनांचा परिणाम आहे हे समजून घ्या.लग्नानंतर कोणकोणत्या अ‍ॅडजेस्टमेंट, तडजोडी करायला लागतील याचा विचार करून तशी तयारी ठेवा.संभाव्य जोडीदाराच्या गुणांबरोबरच त्याच्या मर्यादाही समजून घ्या.विरोध पत्करून लग्न करणारच असाल, तर भविष्यातले धोके, अडचणीही अगोदरच माहीत करुन घ्या.

आपण प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं? आपल्याला भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण का वाटायला लागतं?तो वयाचा परिणाम तर असतोच, पण आपण जसजसं वयात येऊ लागतो, तसतसं आपल्या शरीरात जसे बदल होतात, तसेच आपल्या शरीरात वेगवेगळ्या हार्माेन्सचीही निर्मिती होते. निरनिराळ्या रसायनांची निर्मिती होते. मुलं आणि मुली दोघांमध्येही या रसायनांची निर्मिती होते.मुलांच्या शरीरात इस्ट्रोजेन नावाचं हार्माेन तयार होतं. त्यामुळे आवाज घोगरा होतो. उंचीत झपाट्यानं वाढ होते. लैंगिक जाणिवा वाढीला लागतात.मुलींच्या शरीरात इस्ट्रोजि नावाचं हार्मोन तयार होतं. त्यामुळे शरीराला गोलाई येते. मासिक पाळी सुरू होते. पुरुषांच्या नजरा खेचून घ्याव्यात, त्यांना आपल्याकडे आकर्षित करावं असं वाटायला लागतं.हे सारं नैसर्गिक आहे, पण या वयात असतं ते फक्त भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण. ते प्रत्येकातच आढळतं. त्यात गैर काहीच नाही, पण हे शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम, असंही नाही. बºयाचदा या वयातली मुलं या बाह्य रुपाला आणि आकर्षणालाच भाळतात आणि आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे असं त्यांना वाटायला लागतं. त्याच व्यक्तीशी लग्न करायचं असा निर्णयही ते घेऊन टाकतात. गफलत होते ती इथेच.त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

लग्नापूर्वी काय विचार कराल? काय काळजी घ्याल?१) आपल्या संभाव्य जोडीदाराच्या गुणांबरोबरच मर्यादाही समजून घ्या.२) लग्नाचा निर्णय घेताना संभाव्य संधीचा आणि धोक्यांचा विचार करा.३) एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटणारी ओढ आणि आकर्षण हे शरीरातल्या रसायनांचा परिणाम आहे हे समजून घ्या.४) सर्वांचा विरोध पत्करून लग्न करताना येणाºया परिस्थितीला कसं सामोरं जाता येईल ते आधीच ठरवा.५) पळून जाऊन लग्न करण्यापूर्वी घरातील काही माणसांना तरी विश्वासात घेऊन आपली निवड योग्य आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करा.६) लग्न करताना स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेमध्ये असणारा फरक समजून घ्या. लग्नानंतर कोणकोणत्या अ‍ॅडजेस्टमेंट, तडजोडी करायला लागतील त्यांचा विचार करून तशी तयारी ठेवा.७) कामसुख, जोडीदार, लग्न या व्यतिरिक्त मानवी आयुष्यात खूप काही महत्त्वाचं असतं याचं भान ठेवा.