संशयी पार्टनरला हॅण्डल करण्याची 'ही' ट्रिक वापराल तर डोक्याचा ताप होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 12:12 PM2020-02-26T12:12:43+5:302020-02-26T12:25:59+5:30

दोघांचीही वेगवेगळी अशी लाईफ आहे. त्यामुळे गुंतून राहण्यापेक्षा तुम्हाला स्पेस हवी असल्याल पार्टनरसमोर स्पष्ट करा.

Tips to handle dominating partner | संशयी पार्टनरला हॅण्डल करण्याची 'ही' ट्रिक वापराल तर डोक्याचा ताप होईल कमी

संशयी पार्टनरला हॅण्डल करण्याची 'ही' ट्रिक वापराल तर डोक्याचा ताप होईल कमी

googlenewsNext

रिलेशनशिपमध्ये असताना  तुम्ही जर तुमच्या पार्टनरच्या बोलण्याचा मान ठेवत असाल किंवा त्याचं ऐकत असाल तर  ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा पार्टनर तुम्हाला जास्त फोर्स करत असेल तर इरिटेट होऊ शकतं. जास्त प्रश्न विचारणं आणि  संशय घेण्याच्या सवयीमुळे तुम्हाला मानसिक त्रास सुद्धा  होऊ शकतो.

कोणत्याही नात्यात फ्री स्पेस आणि फ्रीडम या दोन गोष्टींना खूप महत्व असतं. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात  तो व्यक्ती जर जास्त त्रास देत असेल किंवा संशय घेत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पार्टनरला  बरोबर हॅण्डल करू शकता.

समजावून सांगा

फोनवर बिझी असताना संशय घेणे, ठरलेल्या वेळापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन असल्यास राग व्यक्त करणे, मग तू  इतका वेळ कोणाशी बोलत होतीस, आजकाल तुझा कॉल खूप बिझी असतो. अशा पद्धतीने पार्टनर ऐकवत असतो.  पण अनेकदा तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर पार्टनर शारीरिक आणि मानसिररित्या डिस्टर्ब असतो. म्हणून असं वागतो.  अशावेळी उपाय म्हणून पार्टनरला विश्वासात घेऊन समजावून सांगा. 

पर्सनल स्पेस मागा

जर  पार्टनरच्या संशयी स्वभावाचं तुमच्यावर ओझं झालं असेल तर तुम्हाला तुमची स्पेस हवी असल्याचं पार्टनरशी स्पष्ट बोला. दोघांचीही वेगवेगळं अशी लाईफ आहे. त्यामुळे गुंतून राहण्यापेक्षा तुम्हाला स्पेस हवी असल्याचं पार्टनरसमोर स्पष्ट करा.

आपल्या निवडीचे महत्व

काही पार्टनर इतके डॉमिनेटिंग असतात की ते प्रत्येक गोष्टीत स्वतःचा निर्णय कसा बरोबर आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करतात. फिरण्याची गोष्ट असू दे किंवा  हॉटेलमध्ये जाण्याची, ड्रेसिंग स्टाईलची. या सगळ्यात स्वतः कसं बरोबर आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. अनेक मुलींचे पार्टनर हे कपडे  नको घालूस, या ठिकाणी नको जाऊस, असं वारंवार सांगून  पार्टनरला इरिटेट करतात. तुमच्याबाबतीत सुद्धा असं होत असेल तर पार्टनरचं काहीही ऐकण्याआधी स्वतःची चॉईस काय आहे. त्याकडे लक्ष द्या.

काऊंसिलिंगची मदत घ्या

अनेकदा लग्न झाल्यानंतर डॉमिनेटींग पार्टनर दिसून येतात. त्यामुळे चिडचिड होणं, राग येणं हे प्रकार जास्त दिसून येतात.  अशावेळी एखादं काऊंसलिंग सेशन जर तुम्ही अटेंड केलं तर नात्यातील दुरावा आणि भांडण संपून तुमचा पार्टनर तुम्हाला चांगल्या पद्धतीने  समजून घेईल. ( हे पण वाचा-तुम्हाला तुमचा पार्टनर वापरून तर घेत नाहीये ना कसं ओळखाल?...)

लिमिट क्रॉस झाल्यावर काय कराल

जर पार्टनरच्या संशयी आणि डॉमिनेटींग स्वभावामुळे तुम्हाला मानसिकरित्या त्रास होत असेल तर तुम्ही नातं तोडलेलंच बरं. त्यानंतर तुम्ही तुमचे पार्टनर मित्र, आणि आई-वडील यांची मदत घेऊन पार्टनरला समजवण्याचा प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला शारीरिक त्रासाला सामोरं जावं  लागत असेल तर कायद्याची मदत सुद्धा  घेऊ शकता. ( हे पण वाचा-'असा' पार्टनर असेल तर आयुष्य वाढतं आणि मेंदूची क्षमताही, रिसर्चमधून खुलासा... )

Web Title: Tips to handle dominating partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.