अनेक महिला रिलेशनशिपमध्ये असताना असुरक्षित फिल करतात. आपला पार्टनर आपल्याला युज तर करत नाहीये ना असं सतत वाटतं असत. पार्टनरच्या काही सवयींमुळे आपल्याला असे संकेत येत असतात. जर तुम्हाला सुद्धा आपल्या पार्टनरबदद्ल असं वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत.  या टिप्समुळे तुम्हाला तुमचा पार्टनर खरचं प्रेम करतो की फक्त  तुमचा वापर करून घेत आहे. हे लक्षात येण्यास मदत होईल. 

 जर तो तुमच्या नात्यात सुरक्षित वाटत नसेल

अनेक मुली आपल्या नात्यात अनसेफ फिल करत असतात. नात्यांमध्ये एकमेकांची स्तुती करणं गरजेचं असतं. काही मुलं नेहमीच आपल्या पार्टनरची इतर मुलींशी तुलना करत असतात. तसंच आपल्या पार्टनरला कसं कमी लेखता येईल आणि आपणच कसे ग्रेट आहोत. हे सांगण्याचा प्रयत्न करतात.  जर तुमच्यासोबत हे सतत होत असेल तर  तुम्हाला थांबायला हवं कारण तुमचं नातं कधीही तुटण्याची शक्यता असते. 

तुम्हाला अपराधी वाटत असेल 

जर तुमच्यात लहान लहान गोष्टींवरून कटकट होत असेल आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला  दोष देत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या नात्यात दुरावा येत आहे. जेवण बनवण्यापासून, घर सांभाळण्यापर्यंत किंवा शारीरिक सुखाबद्दल सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरला कमी पडताय असं वाटणं म्हणजेच तुमच्या मनात अपराधीपणाची भावना वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी राहू शकतं नव्हतं. 

गरजेच्यावेळी सोबत नसणे

जर तुम्ही एखादा प्लॅन बनवलात त्यानंतर तुमच्या पार्टनरने टेक्स आणि फोन कॉलचं उत्तर न देता गायब होणं. हे अतिशय चुकीचं आहे. एखाद्यावेळी व्यक्तीला काम असू शकतं पण नेहमीच जर असं होत राहील तर तुमचा पार्टनर तुम्हाला गृहीत धरतो असा सुद्धा असू शकतं. ( हे पण वाचा-पार्टनर सुंदर असुनही मुलं का देतात दगा, जाणून घ्या कारण....)

नात्यांमध्ये समजदारपणा नसणे

जर लहान लहान गोष्टींवरून तुमचा पार्टनर तुमच्यावर ओरडत असेल किंवा  तुमच्याशी खोट बोलत असेल, सतत कारणं देत असेल तर  तुम्हाला तुमचा पार्टनर वापरून घेत आहे. वारंवार फिजिकल रिलेशन ठेवण्याची तुमच्याकडून अपेक्षा करत असेल तर हीच गोष्ट तुम्हाला महागात सुद्धा पडू शकते. अर्थात तुम्ही याबाबतीत सकारात्मक असाल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमची इच्छा नसताना फोर्स केला जात असेल तर  तुम्ही याबाबतीत विचार करणं गरजेचं आहे. (हे पण वाचा-मुलींना इंप्रेस करायचं असेल तर कॉम्पलिमेंट देताना 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात)

Web Title: How will you know if your boyfriend is cheating with you or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.