रस्त्यावर फिरू लागला वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 07:21 IST
एक वाघ तिथे आला आणि गाड्यांच्या गर्दीत घुसला.
रस्त्यावर फिरू लागला वाघ
समजा तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात आणि एका ट्रॅफिकमध्ये फसलात आणि कुठूनतरी एक वाघ येऊन तुमच्या गाडीजवळ फिरु लागला तर? तुमचा भीतीने नक्कीच थरकाप उडेल. पण ही केवळ कल्पना नाही तर असे प्रत्यक्षात घडले आहे कतारची राजधानी दोहा येथे.दोहा येथे रस्त्यावर ट्रॅफीक जाम झाला होता. या दरम्यानच एक वाघ तिथे आला आणि गाड्यांच्या गर्दीत घुसला. त्याला तेथे पाहून अनेक लोकांनी तर श्वासच रोखला. २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही या वाघाला पाहू शकता.तो अचानक रस्त्यावर आल्याने तो काय करतोय हे त्यालाच समजेनासे झाल्याचे त्याच्यावरुन जाणवत आहे. दोहा एक्सप्रेस वे वर घडलेला हा प्रसंग कोणीतरी कॅमे-यात कैद केला आणि सोशल साईटवर शेअरही केला आहे. कतारमध्ये लोक पाळतात जंगली जनावरे अजून या गोष्टीची माहिती मिळाली नाही की हा वाघ तेथे कसा काय पोहोचला.कतार येथील लोक जंगली जनावरांना पाळतात. ते त्यांचे स्टेटस सिंबल समजले जाते.