(Image credit-Gulfnews)

सध्याच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या जमान्यात लग्न म्हणजे आयुष्यातलं खूप मोठं पाऊल असतं. साधारणपणे लग्न म्हणजे  दोन कुटुंब ही जोडली जात असतात. म्हणून लग्नाचा निर्णय घ्यायच्या आधी घाई करू नका. लग्नाआधी एकमेकांचे स्वभाव समजून घेणे महत्त्वाच असतं. कारण जर एकमेकांच्या अपेक्षा समजल्यात तरच पुढे होणारे कितीतरी त्रास कमी होतील.  तुमचे लग्न ठरलं असेल किंवा लग्नाचा विचार तुम्ही करत असाल तर त्याआधी काही गोष्टींची चर्चा तुमच्या जोडीदारासोबत आधी करणे आवश्यक आहे. यामुळे पुढे होणा-या समस्या टळतील 

(Image credit- sights and culture)

काहीवेळा दबावाला बळी प़डून लग्नाला होकार दिला जातो. त्यासाठी काही गोष्टी आधी क्लीअर केलेलं चागलं असत. तुमचा होणारा जोडीदार कोणत्यातरी दबावाला बळू पडून आपल्या आयुष्यात येतोय का याची खात्री करा. होणाऱ्या जोडीदाराला तुमच्या आधी  कोणी आवडत होत का. कोणी आवडतं का हे जाणून घ्या.


 (Image credit- special events)

सध्याच्या काळात सर्व मुली या लग्नानंतरही कामासाठी बाहेर पडतात. पण जर जोडीदीराला तुमचे जॉबला जाणे. खटकत असेल. तर लग्नानंतर प्रोब्लेम होऊ शकतात. त्यांमुळे आधी  सगळ्या गोष्टी विचारात घ्या. लग्न झाल्यानंतर दोघांच्याही करिअरमध्ये याचा अडथळा येता कामा नये. याची एकमेकांना हमी देणे तितकेच गरजेचे आहे. आपले काम काय आहे, कामाची वेळ, कामाचे स्वरूप या सगळ्याची कल्पना घरातल्यांना द्या.

(Image credit-Goavilla)

आवडी निवडी एकमेकांसोबत शेअर करा, प्रेमविवाहात या गोष्टी जोडीदाराला आधीच माहिती असतात पण ठरवून लग्न करताना या गोष्टींची पूर्वकल्पना एकमेकांना देणे गरजेचे आहे. यामुळे पुढे होणारी टोकाची भांडणं टाळता येतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरच्यांच्या आवडी निवडी स्वभाव देखील तिला किंवा त्याला समजून सांगा.

Web Title: Things to know before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.