तुम्हाला माहितही नसतील,सुंदर स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात 'या' ८ गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 16:30 IST2020-02-23T14:23:15+5:302020-02-23T16:30:11+5:30
नेहमीच सुंदर स्त्रियांना पाहून पुरूष आकर्षीत होत असतात. पण तुम्हाला आज आम्ही पुरूष स्त्रियांना पाहून कोणता विचार करतात हे सांगणार आहोत.

तुम्हाला माहितही नसतील,सुंदर स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात 'या' ८ गोष्टी!
(image credit- dating and relationship)
कधीही सुंदर मुलगी किंवा मुलगा आपल्या जवळून जात असेल तर वेगळेच संकेत येत असतात. किती छान दिसते ही किंवा किती हॅण्डसम आहे का मुलगा... असे विचार मनात येत असतात. पण फक्त इतकाच विचार करून व्यक्ती थांबत नाही. तर अनेक विचार मनात सुरू असतात. सगळेच पुरूष स्वभावाने आणि विचार करण्याच्या पद्धतीने वेगळे असतात. कोणत्याही सुंदर मुलीला पाहिल्यानंतर त्यांचा मनात वेगवगळे विचार येत असतात. जाणून घ्या कसा विचार करतात पुरूष.
(image credit-thisphani)
बेडरूम पर्फोमन्स कसा असेल
हा सगळ्यात कॉमन विचार मनात येतो तो म्हणजे एखाद्या सुंदर मुलीला पाहिल्यानंतर त्या मुलीला चांगल्या पण तितक्यात सेक्शुअल नजरेने पाहीलं जातं, मानसशास्त्रानुसार ही इन्टिमेट येणारी रिएक्शन आहे. फक्त एक कल्पना म्हणून असं वाटत असतं. तीचा बेडरूम पर्फोमन्स कसा असेल याचा विचार केला जातो.
ती खरंच इतकी सुंदर आहे का
कोणतेही पुरूष स्त्रियांची स्तुती करत असताना त्यांचाकडे बारकाईने पाहत असतात. मग त्यांना असा प्रश्न पडत असतो. की खरचं इतकी सुंदर आहे का? त्यांचासाठी फक्त बाहेरचा लुक नाही तर मुलीच्या आकर्षक असण्यामागे काय कराण आहे. याचा शोध घेण्याचा मुलं प्रयत्न करत असतात.
ती सिंगल असेल का
जास्त कोणताही विचार न करता मुलं सरळ मुद्याचा विचार करतात. एखादी सुंदर मुलगी संपर्कात असल्यानंतर तीचा कोणी पार्टनर आहे का? आपल्याला तिला कसं अप्रोच करता येईल. याचा विचार जास्त करत असतात.
मी तिच्याशी कसं बोलू
(image credit-gifer.com)
कोणतीही मुलगी आवडल्यानंतर तिला काय वाटेल आपणं कसं बोलायला हवं याचा विचार मुलं करत असतात. तिच्याशी बोलण्यासाठी सोशल मिडिया, कॉमन फ्रेंड्स शोधणं हे प्रकार करायला सुरूवात होते,
ती माझ्यासाठी जास्तच चांगली आहे.
(image credit-giphy)
अशी अनेक मुलं असतात ज्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते. सुंदर महिलांना बघून ते त्याचाशी कसं बोलता येईल याचा विचार करतात. आपल्या तुलनेत ती जास्त चांगली आहे म्हणून आपल्याला अशी मुलगी मिळणार नाही. असं त्यांना वाटत असतं.
जर तीने मला रिजेक्ट केलं तर
(image credit-wifflegif)
मुलं ही खूप स्मार्ट असतात. दोन पावलं पुढचा विचार करत असतात. ते आपल्या डोक्याने काम करत असतात. जर आपल्याला आवडत असलेल्या मुलीने आपल्याला रिजेक्ट केलं तर काय रिएक्ट करायचं असा सुद्धा विचार करून ठेवत असतात.
तिची पर्सनॅलिटी कशी असेल
एखादा मुलीचे हावभाव पाहून तिची पर्सनॅलिटी कशी असेल, तीचा स्वभाव कसा असेल असे अनेक प्रश्न मुलांना पडत असतात. ( हे पण वाचा-लग्नाआधी जाणून घ्या कोणत्या राशीचे पुरूष असतात रोमँटिक आणि प्रामाणिक!)
कशाप्रकारचे पुरूष आवडत असतील
कोणतीही मुलगी आवडल्यानंतर तिला आपल्यात इंटरेस्ट असेल का? तिची चॉईस कशी असेल याचा विचार करतात. त्यावरून तिला कसं अप्रोच करायचं हे ठरवतं असतात. ( हे पण वाचा-लग्नाच्या पहिल्या रात्री पार्टनरशी 'या' गोष्टी बोलाल, तर नात्यात कधीच येणार नाही दुरावा)