१० पैकी ७ विवाहित महिला पतींचा करतात घात - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:50 AM2019-04-24T11:50:54+5:302019-04-24T11:56:08+5:30

अनेक महिलांनी त्यांच्या जोडीदारांना केवळ यासाठी दगा दिला कारण त्यांचं वैवाहिक जीवन कंटाळवाणं झालं होतं. 

Survey claims that 7 out of 10 women betray their husbands | १० पैकी ७ विवाहित महिला पतींचा करतात घात - सर्व्हे

१० पैकी ७ विवाहित महिला पतींचा करतात घात - सर्व्हे

Next

एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅप ग्लीडेन (gleeden) ने मंगळवारी केलेल्या एका सर्व्हेत आढळलं की, भारतात १० पैकी ७ महिला त्यांच्या पतीची फसवणूक करतात. कारण त्यांना घरगुती कामांमध्ये सहभागी व्हायचं नसतं. अनेक महिलांनी त्यांच्या जोडीदारांना केवळ यासाठी दगा दिला कारण त्यांचं वैवाहिक जीवन कंटाळवाणं झालं होतं. 

(Image Credit : Men's Health)

ग्लीडेन नावाच्या या डेटिंग अ‍ॅपचे भारतात ५ लाखांपेक्षा जास्त यूजर्स आहेत आणि या अ‍ॅपने 'महिला अडल्टरी म्हणजेच व्यभिचार का करता' या शीर्षकाने एक सर्व्हेक्षण केलं. ज्यात खुलासा झाला की, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता सारख्या महानगरांमध्ये अशा महिलांची संख्या सर्वात अधिक आहे, ज्या त्यांच्या पतीला दगा देतात.

(Image Credit : MenWit)

१३ टक्के महिलांना मान्य केली ही बाब

ग्लीडेनचे मार्केटिंग एक्सपर्ट सोलेन पॅलेट यांनी सांगितले की, '१० पैकी ४ महिलांचं असं मत आहे की, अनोळखी लोकांसोबत मजा-मस्ती केल्यानंतर जोडीदारासोबतचं त्यांचं नातं अधिक मजबूत झालं आहे'. ५ लाख भारतीय ग्लीडन यूजर्समध्ये २० टक्के पुरुष आणि १३ टक्के महिलांनी आपल्या जोडीदाराला दगा दिल्याचं मान्य केलं. 

काय आहे कारण?

ग्लीडन अ‍ॅपला २००९ मध्ये फ्रान्समध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. ग्लीडेन २०१७ मध्ये भारतात आलं आणि दोन वर्षात त्यांचे भारतात ३० टक्के सदस्य आहेत. यात ३४ वर्षांपासून ते ४९ वर्षांच्या विवाहित महिलांचा समावेश आहे. ग्लीडेनचा वापर करणाऱ्या जवळपास ७७ टक्के भारतीय महिलांनी हे मान्य केलं की, त्यांनी त्यांच्या पतीसोबत दगा केला कारण त्यांचं वैवाहिक जीवन नीरस झालं होतं आणि वैवाहिक जीवनाबाहेर एक साथीदार शोधून त्यांना त्यांच्या जीवनात नवा उत्साह मिळाला. 

(Image Credit : Best Life)

या सर्व्हेक्षणातून असही समोर आलं की, भारतात पारंपारिक विवाहात अडकलेल्या समलैंगिक लोकांनाही मोठ्या प्रमाणात या अ‍ॅपची मदत मिळत आहे. 

Web Title: Survey claims that 7 out of 10 women betray their husbands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.