शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दहा दिवसांच्या जपानी रोमान्स लिव्हचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 7:34 AM

बातमी अशी की, जपान सरकारने १० दिवसांची रोमान्स लिव्ह जाहीर केली आहे. हे वाचून अनेकांना वाटलं  असणार की, काय मस्त मामला आहे. इथं आम्हाला एक सीएल मिळायची मारामार!  जपानी लोकांची चंगळ आहे राव!!

-  वरकरणी हे प्रकरण असं गमतीशीर वाटत असलं तरी, जपानी सरकारने जाहीर केलेली ही सुटी त्यांच्यासमोर उभ्या संकटाचं एक भयाण चित्र आहे. जपानचं सरकार लोकांच्या हातापाया पडतंय, की बाबांनो आणि बायांनो, हवं तर भरपगारी दहा दिवस ‘फर्टिलिटी लिव्ह’ घ्या, पण सुटी घ्या. रोमान्स करा आणि मूल जन्माला घाला !.. आणि कहर म्हणजे, एवढी सुटी देऊनही जपानी माणसं मूल जन्माला घालतीलच याची कुणालाही शाश्वती नाही! या योजनेत जपान सरकारने जाहीर केले की, जोडपे नोकरदार असेल, तर दोघेही वर्षाकाठी ही १० दिवस फर्टिलिटी लिव्ह घेऊ शकतात. लोकसंख्या वाढविणे हा तर त्यामागचा हेतू आहेच, मात्र त्यासाेबतच, माणसांना जरा फिल गूड वाटावं, जगण्यात थोडा निवांतपणा यावा, लोकांनी लेकराबाळांचा, कुटुंब वाढविण्याचा विचार शांतपणे करावा, म्हणून ही सवलत आहे. हे असे इतके अगतिक प्रयोग सरकारला करावे लागतात, कारण जपानसमोर असलेले दोन प्रश्न : अत्यंत कमी जननदर आणि   वाढत्या वयाची वाढती लोकसंख्या! - एजिंग पॉप्युलेशन!! जपानचा फर्टिलिटी रेट गेली अनेक वर्षे १.४ टक्के इतकाच आहे. म्हणून सरकार  अगतिकतेने आवाहन करतंय की, मुले जन्माला घाला. आपल्या देशाची लोकसंख्या वाढवा.

एकीकडे जन्मदर कमी, दुसरीकडे मृत्यूदर कमी. लोकांचं आयुर्मान वाढतच आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न  अर्थव्यवस्था आणि तरुण मनुष्यबळाचा. तंत्रज्ञानावर जपानी अर्थव्यवस्था उत्तम चालत असली तरीही, देशात तरुणांची संख्याच कमी होणं, हे देशाच्या सामाजिक आरोग्यासाठीही चांगलं नाही, असं  लोकसंख्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. जपानमध्ये तरुणांच्या संख्येपेक्षा प्राैढ आणि वयस्कांची संख्या मोठी आहे. हे असंच सुरू राहिलं तर २०४० पर्यंत जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोक वृध्द असतील. जपानी सरकारच्याच अभ्यासानुसार जपानमधली तरुण जोडपी व्यावसायिक आयुष्य, करिअर संधी, जबाबदाऱ्या यात मुलांचा विचार करणंच टाळतात किंवा लांबणीवर टाकतात. 

लँसेटने अलीकडेच प्रसिध्द केलेल्या एका अभ्यासानुसार, जपानची लोकसंख्या या शतकाअखेरीस मोठ्या प्रमाणात घटून जेमतेम ५३ मिलिअन इतकी कमी होईल. याचा अर्थ नोकऱ्या आहेत, रोजगार संधी आहेत, पण मनुष्यबळच नाही, असा प्रश्न आहे. १.४ इतकाच जर जपानचा फर्टिलिटी रेट कायम राहिला, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे. आज जितकी देशाची लोकसंख्या आहे, किमान तितकीच राहावी, म्हणून तरी फर्टिलिटी रेट २.१ पर्यंत जायला हवा. तो किमान तितका तरी वाढावा म्हणून जपान सरकार ही नवीन रोमान्स लिव्ह देत आहे. याशिवाय सरकारी व्यवस्थांतून उभारण्यात आलेल्या आधार व्यवस्था, उत्तम पाळणाघरांसारख्या सोयी या व्यवस्थाही जपानने उभारल्या आहेत, तरीही जन्मदर वाढताना दिसत नाही.

जगभरात ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे, ते अन्य देशातल्या लोकांना नागरिकत्व देऊ करतात. जपानी कायदे यासंदर्भात बरेच कडक होते. पण घटती लोकसंख्या पाहून जपानने ते नियमही बऱ्यापैकी आता शिथिल केले आहेत.जपानच्या ग्रामीण भागातले प्रश्न अजून गुंतागुंतीचे आहेत. तिथं वृध्दांच्या वाढीचा दर मोठा आहे. वाढत्या वयात गावात राहायला नको, म्हणून अनेकजण जवळच्या शहरात स्थलांतर करतात. तिथं सोयी अधिक मिळतील, म्हातारपण सुखाचं होईल, अशी आशा असते. त्यामुळे अनेक गावं येत्या काळात ओस पडतील असंही भय आहे. 

या साऱ्यावर महत्त्वाचा उपाय : जन्मदर वाढवायचा प्रयत्न!! म्हणून मग तरुण जोडप्यांनी कुटुंब वाढवावे, वेळेत मुलं जन्माला घालावीत, एकाहून अधिक मुलं झाली तर उत्तम, असं म्हणत नवं सामाजिक धोरण आखलं जात आहे. वरकरणी रोमान्स लिव्हची ही बातमी टपटपीत, आकर्षक आणि व्हायरल चावट वाटत असली तरी, तिच्या पोटात एक मोठा प्रश्न आहे, देशात आपलीच माणसं घटण्याचा, कमी होत जाण्याचा. जपानी जगण्याचं हे वास्तव काळजीत पाडणारंच आहे.

ऑफिस रोमान्स?- नो प्रॉब्लेमआपल्याकडे कार्यालयात एकत्र काम करणाऱ्या तरुण सहकाऱ्यांनी जरा एकमेकांशी दोस्ती वाढवली की, त्यांच्या अफेअरच्या वावड्या उठतात. जपानमध्ये मात्र आता ऑफिस रोमान्सलाही प्रोत्साहन दिलं जात आहे. एकत्र काम करा, नोकऱ्या टिकवा, लग्न करा, कुटुंब वाढवा, कुणाचा काही आक्षेप नाही. जगात अनेक ठिकाणी असं ऑफिसात लग्न ठरलं, तर एकाला नोकरी सोडावी लागते. जपानमध्ये मात्र काही कंपन्या असं सांगतात की, तुमचा विभाग तेवढा बदलू, बाकी नोकऱ्या शाबूत राहतील.

टॅग्स :Japanजपान