शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मोठं होऊन किती कमावणार?; आता मुलांच्या वागण्यावरून समजणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 13:31 IST

मुलं लहान असल्यापासूनचं पालक त्याचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. मग ते त्याला न्हाउ-माखू घालणं असो किंवा त्याची काळजी घेणं, सर्वच गोष्टींमध्ये ते मुलाला काय हवं-नको ते सर्वच पुरवत असतात.

(Image Credit : justscience.in)

मुलं लहान असल्यापासूनचं पालक त्याचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. मग ते त्याला न्हाउ-माखू घालणं असो किंवा त्याची काळजी घेणं, सर्वच गोष्टींमध्ये ते मुलाला काय हवं-नको ते सर्वच पुरवत असतात. एवढचं नव्हे तर त्यानं काय करिअर करावं, याचाही विचार करून ते त्यादृष्टीने त्याला शिक्षण किंवा एक्सट्रा अ‍ॅक्टिव्हिटींचे धडे देत असतात. अनेकदा प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की, माझ्या मुलाने मोठं होऊन एखाद्या अशा क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवावं, जिथे त्याला नाव आणि पैसे सर्व काही मिळेल. याबाबतच काही दिवसांपूर्वी एक संशोधन करण्यात आलं असून या संशोधनामधून संशोधकांनी मुलांच्या वागण्यावरून तो मोठा होऊन किती पैसे कमावू शकतो, याचा अंदाज बांधता येत असल्याचा दावा केला आहे. 

कॅनडामध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, केजीमध्ये म्हणजेच साधरणतः बालवर्गामध्ये शिकत असलेल्या मुलांच्या वागण्यावरून सहज अंदाज लावला जाऊ शकतो की, भविष्यामध्ये त्यांचं उत्पन्न किती असू शकेल. हा रिसर्च कॅनडामधील मॉन्ट्रियलच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी केला आहे. 

या संशोधनामध्ये 6 वर्षांच्या जवळपास 920 मुलांना सहभागी करण्यात आले होते. यादरम्यान निष्काळजी, हायपरअ‍ॅक्टिव्हिटी, स्वभावाचे वेगवेगळे पैलू, त्यांची आक्रमकता आणि सामाजिकता या मुद्यांच्या आधारावर निरिक्षणं नोंदविण्यात आली. त्यानंतर संशोधकांनी 35 ते 36 वयोगटातील लोकांची टॅक्स रिटर्न करण्यासंदर्भातील माहिती एकत्र केली. दोन्ही निरिक्षणं एकत्र करून संशोधकांनी काही अंदाज व्यक्त केलं आहेत. 

निष्काळजी मुलांचं उत्पन्न असू शकतं कमी

संशोधकांना संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, जी मुलं सर्वात जास्त निष्काळजी होती, त्यांचं वार्षिक उत्पन्न निष्काळजी नसलेल्या मुलांच्या उत्पन्नापेक्षा 17,000 डॉलर (जवळपास 12 लाख रूपये) पेक्षाही कमी असू शकतं. याव्यतिरिक्त जी मुलं इतर मुलांच्या तुलनेत जास्त सामाजिक होती त्या मुलांचं वार्षिक उत्पन्न जवळपास 12000 डॉलर किंवा जवळपास 8 लाख 57 हजार रूपयांपेक्षा जास्त होतं 

दरम्यान, संशोधनातून असं सिद्ध झालं की, हायपरअॅक्टिव्ह किंवा आक्रमक मुलांचीही भविष्यातील कमाई फार कमी होती. परंतु, संशोधनातून सिद्ध झालेले निष्कर्ष सांख्यिकीय दृष्ट्या महत्त्वाचे नव्हते. 

टॅग्स :ResearchसंशोधनParenting Tipsपालकत्वRelationship TipsरिलेशनशिपCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन