मुलीला प्रपोज करण्याआधी या 5 गोष्टींची घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 16:25 IST2018-04-17T16:25:23+5:302018-04-17T16:25:23+5:30
जर तुम्ही एखाद्या मुलीला पसंत करता आणि लवकरच तिला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर या 5 गोष्टींची काळजी घ्या.

मुलीला प्रपोज करण्याआधी या 5 गोष्टींची घ्या काळजी
जर तुम्ही एखाद्या मुलीला पसंत करता आणि लवकरच तिला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर या 5 गोष्टींची काळजी घ्या. या चुका तुम्ही केल्या तर तुमचं होणारं कामही होणार नाही. त्यामुळे त्या गोष्टींचा नंतर पश्चाताप होण्यापूर्वी त्या जाणून घ्या.
1) मित्रांना सोबत घेऊन जाऊ नका
मुलीला प्रपोज करण्यासाठी जाताना चुकूनही आपल्या मस्तीखोर मित्राला सोबत घेऊन जाऊ नका. त्याला सोबत घेऊन गेल्यावर गमतीने हा होईना त्याने तुमचं एखादं गुपित उघड केलं तर तुमचं काम होण्याआधीच बिघडू शकतं.
2) मुलीचं मन जाणून घ्या
मुलीला प्रपोज करण्यापूर्वी ती तुमच्याप्रति किती गंभीर आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तिला तुमच्याबद्दल काय वाटतं, तिला हे नातं कुठपर्यंत पुढे न्यायचं आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
3) प्रपोज करण्याची जागा
प्रपोज करण्याची जागा फारच महत्वाची आहे. त्यामुळे प्रपोज करण्याची जागा विचार करुन निवडा. दोघांसाठीही खास असलेली जागा निवडा किंवा त्या मुलीच्या आवडत्या जागेची निवड करा.
4) लूक महत्वाचा
तुमच्या आयुष्यातील या सर्वात खास क्षणाला यादगार करण्यासाठी परफेक्ट दिसणंही महत्वाचं आहे. पण परफेक्ट दिसलंच पाहिजे अशी काही अट नसते. पण तुम्ही व्यवस्थित तयारी करुन गेलात तर तितकंच त्या मुलीला आणखी चांगलं वाटेल.
5) प्रपोज
जेव्हा फायनली प्रपोज करण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही केलेल्या प्लॅनवर पुन्हा एकदा विचार करा. कोणत्याही प्रकारच्या परीणामासाठी तयार रहा.