लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी ७० टक्के माता घेतात स्मार्टफोनची मदत - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:08 IST2019-05-14T12:01:27+5:302019-05-14T12:08:35+5:30
लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी काही वर्षांपर्यंत किंवा अजूनही काही प्रमाणात पहिल्यांदाच आई झालेल्या महिला त्यांची आई, नातेवाईक किंवा मैत्रिणींच्या सल्ल्यावर अवलंबून राहत होत्या.

लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी ७० टक्के माता घेतात स्मार्टफोनची मदत - रिसर्च
(Image Credit : Children)
लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी काही वर्षांपर्यंत किंवा अजूनही काही प्रमाणात पहिल्यांदाच आई झालेल्या महिला त्यांची आई, नातेवाईक किंवा मैत्रिणींच्या सल्ल्यावर अवलंबून राहत होत्या. पण आता हे चित्र बदलत चाललं आहे. टेक्नॉलॉजीच्या या जमान्यात स्मार्टफोनने पॅरेंटींगबाबत मातांना आत्मनिर्भर बनवलं आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून समोर आलं आहे की, आपल्या मुला-मुलींची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी, त्यांचं पालन-पोषण करण्यासाठी भारतातील साधारण ७० टक्के माता स्मार्टफोनचा वापर करतात.
पॅरेंटींग स्मार्टफोनमुळे झालं सोपं
या सर्व्हेत १० पैकी ८ मातांनी हे मान्य केलं आहे की, टेक्नॉलॉजीने पॅरेंटींगला फार सोपं केलं आहे. तसा तर लहान मुलांचा सांभाळ करत असताना स्मार्टफोन हा सर्वात जास्त वापरला जाणारा डिव्हाइस आहे. तरी सुद्धा ३८ टक्के लोकच असे आहेत जे आपल्या परिवाराला किंवा मित्रांना स्मार्टफोन वापरण्याचा सल्ला देतात. इंटरनेट बेस्ड रिसर्च आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म यूगोव (YouGov) ने एक अभ्यास केला. ज्यातून हे समोर आलं की, भारतातील साधारण ७० टक्के माता पॅरेंटींग टिप्ससाठी स्मार्टफोन आणि पॅरेंटींगचा वापर करतात.
ऑनलाइन ब्लॉग्स बघतात ५० टक्के माता
(Image Credit : Video Blocks)
तसेच या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, जेव्हा पॅरेंटींगसंबंधी सल्ल्यांचा विषय येतो तेव्हा भारतात आताही माता परिवार आणि ऑफलाइन सपोर्टवर जास्त विश्वास ठेवतात. असे असले तरी सुद्धा साधारण ५० टक्के तरूण आणि नवीन माता अशा आहेत, ज्या बाळांच्या पालन-पोषणासाठी ऑनलाइन ब्लॉग्स आणि अॅप्समधून माहिती घेतात. या सर्व्हेसाठी यूगोवने १२ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांपासून ते १८ वर्षांच्या मुलांच्या मातांच्या मुलाखती केल्या आणि त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागलं.
लहान मुलांचा 'या'पासून बचाव आव्हानच
१२ महिन्यांपेक्षा कमी बाळांपासून ते ३ वर्षांच्या बाळांच्या मातांना यंग मदर्स कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आणि या कॅटेगरीमध्ये साधारण ७०० मातांचा डेटा कलेक्ट करण्यात आला. या मातांच्या लाइफमध्ये तसं तर टेक्नॉलॉजीला महत्त्वाचं स्थान आहे. पण स्मार्टफोन आणि अॅप्स जे निष्कर्ष देतात, त्याबाबत या मातांच्या मनात एकप्रकारची भितीही राहते. आजच्या या डिजिटल विश्वात पॅरेंटींगची सर्वात मोटी भिती काय आहे? हे विचारल्यावर साधारण ७६ टक्के मातांचं म्हणणं होतं की, आपल्या मुला-मुलींना सायबर बुलिंगपासून वाचवणे सर्वात मोठं आव्हान आहे.