२०१८ मध्ये मुला-मुलींच्या या नावांची होती क्रेझ, जाणून घ्या काही खास आणि वेगळी नावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 11:48 IST2019-01-12T11:45:40+5:302019-01-12T11:48:19+5:30
भारतात मुलांची मुला-मुलींची नावे अशी ठेवतात ज्यातून काहीतरी अर्थ निघावा. घरातील मोठ्यांचं म्हणणं असतं की, नावाचा मुलांवर प्रभाव पडतो.

२०१८ मध्ये मुला-मुलींच्या या नावांची होती क्रेझ, जाणून घ्या काही खास आणि वेगळी नावे!
(Image Credit : www.idiva.com)
प्रसिद्ध लेखक विलियम शेक्सपिअर म्हणाले होते की, 'नावात काय आहे?'. म्हणजे गुलाबाचं नाव दुसरं काहीही असलं असतं तरी त्याचा सुगंध तर तसाच राहिला असता. तरीही नवजात मुला-मुलींची नावे ठेवण्याबाबत पालक फारच उत्सुक आणि कन्फ्यूज राहतात.
भारतात मुलांची मुला-मुलींची नावे अशी ठेवतात ज्यातून काहीतरी अर्थ निघावा. घरातील मोठ्यांचं म्हणणं असतं की, नावाचा मुलांवर प्रभाव पडतो. जर नाव सकारात्मक असेल तर मुलंही सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात असं म्हटलं जातं.
पण सध्या एक नवीन चलन सुरु झालं आहे. ज्यात मुला-मुलींच्या नावातून धर्माची काही माहिती मिळू नये अशी नावे ठेवली जातात. २०१८ मध्ये खाली दिलेल्या काही नावांची फारच क्रेझ बघायला मिळाली, अशी आशा केली जात आहे की, २०१९ मध्येही ही नावे अनेकांना आवडतील.
मुलांची नावे
आरव
अयान
दक्ष
नक्ष
रेयांश
अद्वैत
अथर्व
अंश
सायन
क्रिशिव
विवान
मुलींची नावे
अमायरा
अहाना
समायरा
नायरा
अकिरा
शेषा
कियारा
सुहाना
जारा
नितारा
चार्वी
काषवी
शनाया