शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मेनोपॉज आणि मिशेल ओबामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 7:57 AM

मिशेल ओबामा म्हणतात की मेनोपॉज टाळण्याचा, दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. पन्नाशीतल्या सौंदर्याची खुमारी वेगळीच असते!

- प्रतिनिधी

मेनोपॉज हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा. वयाच्या 40 ते 50 च्या दरम्यानचं स्त्रियांचं आयुष्य हे अतिशय गजबजलेलं, कामाने आणि       जबाबदा-यांनी वेढलेलं असतं.  नेमक्या याच टप्प्यावर मेनोपॉज चाहुल द्यायला लागतो. पण या चाहुलीकडे लक्ष द्यायला , त्याची दखल घ्यायला, शरीर , मनात होणारे बदल समजून घ्यायला, त्यावर उपाय करायला स्त्रियांकडे ना उसंत असते ना त्याबाबतची जाणीव, ना माहिती! अचानक कधीकधी अस्वस्थ होतं. सगळं छान असताना मनावर निराशेचं मळभ दाटतं. हार्मोनच्या असंतुलनाचा हा परिणाम. पण या सर्वाकडे नेहेमीप्रमाणोच दुर्लक्ष करण्याची सवय स्त्रियांना असते. पण मिशेल ओबामा, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मात्र या विषयावर आवजरून बोलल्या आहेत. ’मिशेल ओबामा पॉडकास्ट’ या कार्यक्रमात डॉ. शेरॉन मॅलोन  (वॉशिंग्टन डीसी येथील स्रीरोग तज्ज्ञ) या आपल्या मैत्रिणीसोबत त्यांनी मेनोपॉज या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.  मिशेल म्हणतात, हार्मोन्सच्या असंतुलनानं होणारे बदल हे हार्मोन थेरपीच्या मदतीनं आटोक्यात आणता येतात. ही थेरेपी मी स्वत: घेतली आहे. पण यासाठी स्वत:ला काहीतरी होतंय हे आधी ओळखता तर यायला हवं.  बराक प्रेसिडेंट असताना मी ही थेरेपी सुरू केली होती. मला हॉट फ्लशेसचा            ( शरीरातून गरम वाफा निघणं) त्रास होत असे. एकदा तर मी छान तयार होऊन एका कार्यक्रमासाठी बाहेर पडणार होते पण अचानक कोणीतरी आतून आग लावावी एवढी शरीराची आग व्हायला लागली. मी घामानं ओथंबलेले होते. बराक माझ्या शेजारी होते. मला काय होतंय याची त्यांना जाणीव होती. मुळात त्यांच्या कार्यालयातील महिला कर्मचा:यांपैकी  अनेकजणी मेनोपॉजच्या टप्प्यात होत्या. विनाकारण घामानं ओथंबलेल्या स्त्रियांना ओबामांनी बघितलं होतं.  मला आराम मिळावा यासाठी त्यांनी लगेच एसीचं तापमान अजून कमी केलं.’  मेनोपॉजच्या या टप्प्यातून स्त्रिया जात असतात, तेव्हा घरी दारी  या बदलाला समजून घेईल अशी ना व्यवस्था असते  ना व्यक्ती. त्यासाठी महिलांनी स्वत: संवेदनशील असायला हवं. आपल्या शरीर मनात जो बदल होतो तो समजून घ्यायला हवा. त्याबदल मनमोकळेपणानं बोलायला हवं. 

मिशेल ओबामा म्हणतात,  ‘मेनोपॉजमुळे शरीरात बदल घडतात.  पुनरूत्पादनाची प्रक्रिया थांबते. शरीराच्या गोलाई-घोटाईत बदल होतो. मनोवस्थेत चढ उतार होतात.   स्त्रिया या बदलाबद्दल जागरूक आणि संवेदंशील होण्याऐवजी या टप्प्याची, बदलाची लाज वाळगतात, झालेले बदल लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. यातून खरंतर स्त्रियांचीच दमछाक होते. विशीचं सौंदर्य वेगळं. पन्नाशीतलं वेगळं. पण पन्नाशीत असतांनाही विशीचं सौंदर्य टिकवण्याचा अट्टाहास  निर्थकच. खरंतर हे प्रत्येक स्त्रीनं समजून घ्यायला हवं आणि आ़पल्या मुलींनायाबद्दल समजून सांगायला हवं. मेनोपॉज हा दुर्लक्ष करण्याचा, टाळण्याचा विषय नाही. तर तो समजून घेण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे.’