शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

नव्याने प्रेमात पडला असाल तर पार्टनरसोबत बोलताना या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 1:42 PM

काही कपल्स हे ऐकमेकांशी बोलताना कशाचाही विचार न करता काहीही बोलतात. याचा प्रभाव तुमच्या नात्यावर होतो.

प्रेमाच पडणं ही या जगातली सर्वात सुंदर भावना असावी. जेव्हा एखादा व्यक्ती कुणाच्या प्रेमात असतो तेव्हा त्या व्यक्तीची काळजी घेणे हे साहजिकच आलं. पण प्रेम जर नवंनवं असेल तर अनेक गोष्टीं उत्साहाच्या भरात बोलल्या आणि केल्या जातात. प्रेमात असलेले लोक एक वेगळ्याच विश्वात रमत असतात. पण काही कपल्स हे ऐकमेकांशी बोलताना कशाचाही विचार न करता काहीही बोलतात. याचा प्रभाव तुमच्या नात्यावर होतो.  त्यामुळे एकमेकांसोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...

नात्याबाबत इमानदार रहा

नवीन नात्यात बातचीत होत असताना जास्तीत जास्त प्रश्न हे पर्सनल गोष्टींबाबत असतात. या प्रश्नांची उत्तरं इमानदारीने द्यावी, जेणेकरून तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला योग्यप्रकारे समजू शकेल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी खोटं सांगितलं आणि ती बाब तुमच्या पार्टनरला बाहेरून कळाली तर त्याला वाईट वाटू शकतं. याने त्याच्या मनात तुमच्याविषची चुकीची धारणा निर्माण होऊ शकते. जर तुम्ही तुमच्यातील एखादी वाईट गोष्ट किंवा तुमची वाईट सवय आधीच पार्टनरला स्वत:हून सांगितली तर कदाचित तुमच्यावरील पार्टनरचा विश्वास वाढू शकतो.  

गंमतीतही तुलना करु नका

कधी कधी गंमतीत किंवा रागात काही लोक आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्याच्या पार्टनरसोबत किंवा एक्ससोबत करतात. पण कुणालाही त्यांची तुलना इतरांशी केलेली पसंत पडणार नाही. अशाप्रकारे तुलना केल्यास तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. 

प्रेमाचा पुरावा मागू नका

नातं नवीन असताना अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरकडे प्रेमाचा पुरावा मागतात. यावर पुरावा म्हणून मिळणाऱ्या उत्तराने भलेही तुम्हाला काहीवेळ बरं वाटत असेल, पण ही गोष्ट पुढे जाऊन पार्टनरला इरिटेट करणारी ठरु शकते. प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्याचा पुरावा मागणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. प्रेम असेल तर ते तुम्हाला दिसेलच पुरावा मागण्याची गरज नाही. 

विनाकारणचे प्रश्न विचारु नका

प्रेमात अधिकाराची भावना असते. या भावनेने प्रेरित होऊन अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरच्या खाजगी आयुष्यात लुडबूड करतात. हे तुमच्या पार्टनरला अजिबात आवडणारं नसतं. त्यामुळे असे प्रश्न विचारूच नये जे तुमच्या पार्टनरला पसंत नाहीयते किंवा त्यांची उत्तरं देताना त्यांना अवघडल्यासारखं होत असेल. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट